Mahabreaking

[breaking_news]

illegal sand transport :देऊळगाव राजात अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाचा दणका; दोन ट्रॅक्टर जप्त

illegal sand transport : तालुक्यातील अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा धडाका कायम ठेवत मंडपगाव परिसरात दोन ट्रॅक्टर जप्त केले. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, पुढील दंडात्मक कारवाई होईपर्यंत दोन्ही ट्रॅक्टर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अटकाव करून ठेवण्यात आले आहेत.

illegal sand transport

 मंडपगाव परिसरात रेती माफियांवर कारवाई; तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या पथकाची धडक मोहीम

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : तालुक्यातील अवैध रेती वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाईचा धडाका कायम ठेवत मंडपगाव परिसरात दोन ट्रॅक्टर जप्त केले. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही कारवाई केली असून, पुढील दंडात्मक कारवाई होईपर्यंत दोन्ही ट्रॅक्टर देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अटकाव करून ठेवण्यात आले आहेत.

महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.४५ वाजता मौजे मंडपगाव (ता. देऊळगाव राजा) परिसरात गस्तीदरम्यान दोन ट्रॅक्टर अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळून आले. दोन्ही ट्रॅक्टरमध्ये प्रत्येकी सुमारे एक ब्रास रेती भरलेली होती. संबंधित वाहनचालकांकडे रेती वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे अथवा परवानगी नसल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आल्याने महसूल विभागाने तात्काळ कारवाई केली.

सदर दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आला आहे. महसूल विभागामार्फत नियमानुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ही कारवाई तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर तांबे, महसूल शिपाई अर्जुन सोनसळे तसेच महसूल विभागाच्या पथकाने संयुक्तपणे केली.

दरम्यान, तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच अवैध रेती उत्खनन किंवा वाहतुकीची माहिती नागरिकांनी महसूल विभागाला देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top