Mahabreaking

[breaking_news]

Horrific accident :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; खासगी बस ट्रकवर आदळली , कारचीही जोरदार धडक

Horrific accident : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी (दि. 26) पहाटे झालेल्या साखळी अपघातात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अज्ञात ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्र, सिंदखेडराजा येथील पोलिस, एमएसएफ जवान, 108 रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Horrific accident

   तिन वाहनांच्या अपघात एक गंभीर, चार जखमी, वाहतूक मात्र सुरळीत, अज्ञात ट्रक चालकाने लेन बदल्याने घडला अपघात

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : समृद्धी महामार्गावरील नागपूर कॉरिडॉरमध्ये रविवारी (दि. 26) पहाटे झालेल्या साखळी अपघातात एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली असून अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. अज्ञात ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्र, सिंदखेडराजा येथील पोलिस, एमएसएफ जवान, 108 रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

accident

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे सुमारे 3.55 वाजता नियंत्रण कक्ष, छत्रपती संभाजीनगर येथून समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 336.200 (नागपूर कॉरिडॉर) येथे अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

मुंबईहून नागपूरकडे जाणारी ट्रॅव्हल्स (क्रमांक MH 14 LX 1320) अज्ञात ट्रकच्या मागे प्रवास करत असताना ट्रक चालकाने अचानक लेन बदलल्यामुळे ट्रॅव्हल्सची ट्रकला पाठीमागून धडक बसली. यानंतर मागून येणाऱ्या महिंद्रा XUV (क्रमांक MH 43 CU 1161) या कारनेही ट्रॅव्हल्सला जोरदार धडक दिल्याने साखळी अपघात घडला.

या अपघातात ट्रॅव्हल्समधील विनोद नागोश (वय 47) व खलील खान (वय 55) हे किरकोळ जखमी झाले. तर कारमधील प्रणव मिश्रा (वय 44) आणि मोहित मिश्रा यांनाही किरकोळ दुखापत झाली. मनीष पांडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच एचसी गायकवाड (998), पीसी 2611, एमएसएफचे दोन जवान, तसेच 108 रुग्णवाहिका चालक दिगांबर शिंदे व सुशील मरमट यांनी घटनास्थळी धाव घेतली. डॉ. वैभव बोराडे आणि डॉ. यासीन शहा यांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने सिंदखेडराजा येथील रुग्णालयात हलविले.

अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गाच्या 120 किमी प्रतितास वेगाच्या लेनमध्ये असल्याने क्रेनच्या सहाय्याने वाहने हटविण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. पोलिसांनी तात्काळ बॅरिकेडिंग करून वाहतूक सुरक्षितपणे सुरू ठेवली. त्यामुळे काही काळ अडथळा निर्माण झाला असला तरी वाहतूक लवकरच सुरळीत करण्यात आली.

या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास सिंदखेडराजा पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top