Mahabreaking

[breaking_news]

Panic caused :  चांडोळ यात्रेत कुकरी घेऊन दहशत; धाड पोलिसांची तात्काळ कारवाई, तरुण अटकेत

Panic caused : बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम चांडोळ येथे सुरू असलेल्या सार्वजनिक यात्रेदरम्यान हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध धाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे यात्रेतील संभाव्य अनुचित प्रकार टळला असून पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Panic caused
सार्वजनिक यात्रेत धारदार शस्त्रासह फिरणाऱ्यावर गुन्हा; मद्यधुंद अवस्थेतील आरोपीला पोलिसांनी पकडले

धाड  : बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम चांडोळ येथे सुरू असलेल्या सार्वजनिक यात्रेदरम्यान हातात धारदार शस्त्र घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणाविरुद्ध धाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे यात्रेतील संभाव्य अनुचित प्रकार टळला असून पोलीस प्रशासनाच्या तत्परतेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ जुलै रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता ग्राम चांडोळ येथील सार्वजनिक यात्रेत दिपक ऊर्फ दत्तात्रय उमेश चिचोले (वय २२, रा. धाड, ता. जि. बुलढाणा) हा तरुण हातात धारदार शस्त्र (कुकरी/खंजीर) घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या या वर्तनामुळे यात्रेसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही काळ यात्रेच्या परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती.
घटनास्थळी यात्रेच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या धाड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपीला शस्त्रासह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता, त्याने मद्यसेवन केल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०३/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ मधील कलम ४ व २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १३५(१) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रविंद्र हजारे करीत आहेत.
दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगणे, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणे किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराला पोलीस प्रशासनाकडून अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रकारच्या घटनांमध्ये संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा धाड पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आला आहे. यात्रा, जत्रा आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान नागरिकांनीही संशयास्पद हालचाली अथवा अनुचित प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top