Mahabreaking

[breaking_news]

Planting of 227 trees :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२७ वृक्षांची लागवड

Planting of 227 trees : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोपाल काबरा यांच्या पुढाकारातून बीबी, किनगाव जट्टू आणि भुमराळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत २२७ विविध जातींच्या वृक्षांची लागवड करून वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करण्यात आला.

Planting of 227 trees

  ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संकल्प; बीबी, किनगाव जट्टू व भुमराळा येथे वृक्षारोपण अभियान

रमेश खंडागळे 

बीबी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोपाल काबरा यांच्या पुढाकारातून बीबी, किनगाव जट्टू आणि भुमराळा परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत २२७ विविध जातींच्या वृक्षांची लागवड करून वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करण्यात आला.

या अभियानात वड, पिंपळ, निंब, चिंच, आंबा, बेल आणि चंदन यांसारख्या पर्यावरणपूरक व उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. स्मशानभूमी, मंदिर परिसर, शाळा परिसर तसेच सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करून परिसर हिरवागार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी गोपाल काबरा यांनी सांगितले की, केवळ वृक्ष लागवड करून थांबणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन करणे अधिक महत्त्वाचे आहे. मागील वर्षी लावलेल्या सुमारे २०० वृक्षांचे नियमित संगोपन करण्यात आले असून, उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करून ती झाडे जगविण्यात आली आहेत. यावर्षीही लावलेल्या सर्व वृक्षांचे नियमित संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

“झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन गोपाल काबरा यांनी केले. वृक्षसंवर्धनामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि भावी पिढीला स्वच्छ, निरोगी व समृद्ध वातावरण मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

या उपक्रमात भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण धाईत, सोशल मीडिया संयोजक देवानंद सानप, शेख आनीस, अमोल मुळे, तानाजी खुळे, संतोष मोरे, विनोद सातपुते, राजेंद्र नागरे, गजानन जायभाये, माधवराव बिन्नीवाले, फिरोज भाई, विजय इंगळे, तुषार अग्रवाल, विजय तोष्णीवाल, पांडुरंग गावडे, संजय काळुसे, राम डुकरे, भागवत मुळे, आकाश बनकर, रामदास मोरे, राजेंद्र बोरुडे, महादेव टेकाळे, प्रभाकर टेकाळे, रामेश्वर चौधरी, देवा मुळे, गजानन सानप, शिवानंद कायंदे यांच्यासह ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.

पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top