Mahabreaking

[breaking_news]

Loans :जिल्ह्यातील १२ हजार १०७ शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ ; आधार, अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य

Loans : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी बँकांचे १२ हजार १०७ शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

Loans

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना; आवश्यक प्रक्रीया करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बुलढाणा : महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सहकारी बँकांचे १२ हजार १०७ शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तसेच अॅग्रीस्टॅक (AgriStack) अंतर्गत नोंदणी व प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. याशिवाय शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि बँक खाते परस्पर लिंक असणे आवश्यक असून, ज्यांचे खाते अद्याप लिंक झालेले नाही त्यांनी संबंधित सहकारी संस्था किंवा बँकेशी तातडीने संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आधार प्रमाणीकरण, अॅग्रीस्टॅक नोंदणी आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील सहकारी संस्था, ‘आपले सरकार’ सेवा केंद्र किंवा अधिकृत सेवा केंद्राशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रांसह ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.

योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण किंवा तक्रार उद्भवल्यास संबंधित तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे संपर्क साधून दाद मागता येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक औपचारिकता वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top