Mahabreaking

[breaking_news]

  The body of an unidentified man :वनविभागाच्या हद्दीत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

The body of an unidentified man : पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातुर-नंदापूर शिवारातील वनविभागाच्या परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अंदाजे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यावर किडेही लागलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

The body of an unidentified man

 पातुर-नंदापूर शिवारात धक्कादायक घटना; कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला

पिंजर : पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातुर-नंदापूर शिवारातील वनविभागाच्या परिसरात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एका अंदाजे ४० ते ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्यावर किडेही लागलेले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर वसंतराव राऊत (वय ४७, व्यवसाय शेती, रा. सोनखास, ता. जि. अकोला) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या पत्नी सौ. शारदा सुधीर राऊत या ग्राम सोनखासच्या पोलीस पाटील असून त्यांच्याकडे ग्राम पातुर-नंदापूरचा प्रभारी कार्यभारही आहे.

शुक्रवारी (दि. २४ जुलै) सकाळी पातुर-नंदापूर शिवारातील वनविभागाच्या परिसरात एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुधीर राऊत यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा झाडाच्या फांदीला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला.

मृत इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह बराच काळ तसाच राहिल्याने तो कुजलेल्या अवस्थेत असून शरीर फुगलेले होते. त्यावरील कपडे फाटलेले दिसत होते आणि मृतदेहावर किडेही लागलेले होते. घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित इसमाचा मृत्यू गळफासामुळे झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.मृतकाच्या हातावर सुरेश नाव गोंदलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या घटनेप्रकरणी मर्ग क्रमांक ३२/२०२६ दाखल करण्यात आला असून, नोंद सहायक पोलिस उपनिरीक्षक (ASI) दिगांबर पवार यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पंकज पवार करीत आहेत.

दरम्यान, मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून परिसरातील गावांमध्ये चौकशी सुरू आहे. मृत इसमाबाबत माहिती असलेल्या नागरिकांनी पिंजर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top