Mahabreaking

[breaking_news]

  Free eye check-up camp :अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर

Free eye check-up camp : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव फरहान अमीन यांच्या पुढाकाराने डॉ. वंदनाताई जगन्नाथ ढोणे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय, पातूर येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  Free eye check-up camp

 फरहान अमीन यांच्या पुढाकाराने पातूरमध्ये नेत्र तपासणी शिबिर; विद्यार्थ्यांच्या आरोग्य जागरूकतेवर भर

निशांत गवई

पातूर : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव फरहान अमीन यांच्या पुढाकाराने डॉ. वंदनाताई जगन्नाथ ढोणे ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय, पातूर येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

add

शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची सखोल तपासणी करून दृष्टीदोष, डोळ्यांचे आरोग्य, योग्य उपचारपद्धती तसेच डोळ्यांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. दृष्टीदोषांचे लवकर निदान झाल्यास भविष्यातील गंभीर समस्या टाळता येतात, याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

शेकडो विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेत मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. आरोग्यविषयक जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे महाविद्यालय प्रशासन आणि विद्यार्थ्यांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, राम अमानकर, शेख मेहबूब, अमीन बाळापूर, साखरकर गुरुजी, राजेश मालोकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना फरहान अमीन म्हणाले की, “विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होते. भविष्यातही विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील.”

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत नेत्र तपासणीची सुविधा मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. तसेच अशा आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top