Mahabreaking

[breaking_news]

Legal awareness program: शरद पवार विद्यालयात कायदेविषयक जनजागृती; सायबर सुरक्षा व विद्यार्थी सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

Legal awareness program: बुलढाणा तालुक्यातील वरुड येथील शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार, दि. 23 जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणाची माहिती देणे आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

Legal awareness program

   ‘जिद्द आणि चिकाटीने यशाचे शिखर गाठता येते’ – पोलीस निरीक्षक आदिनाथ मोरे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

पंडित सावळे

मासरूळ  : बुलढाणा तालुक्यातील वरुड येथील शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार, दि. 23 जुलै रोजी विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करणे, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणाची माहिती देणे आणि सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य किरण तायडे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून धाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदिनाथ मोरे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक आदिनाथ मोरे म्हणाले, “जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते. विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण, शिस्त आणि कायद्याचा आदर यांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे.”

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सॲप वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये, असे आवाहन केले.

विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘गुड टच आणि बॅड टच’, तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदी याविषयी माहिती देण्यात आली. अनुचित प्रसंगांना धैर्याने सामोरे जात त्वरित पालक, शिक्षक किंवा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

याशिवाय वाहतूक नियमांचे पालन, अल्पवयीन मुलांनी विनापरवाना वाहने चालवू नयेत, हेल्मेटचा वापर करावा, व्यसनाधीनतेपासून दूर राहावे आणि अभ्यासासोबत चांगले छंद जोपासावेत, असेही त्यांनी सांगितले.

संकटाच्या वेळी उपयोगी पडणारे आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक 112 तसेच महिला हेल्पलाइन यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पोलिसांच्या शस्त्रास्त्रांची ओळख करून देत त्यांच्या कार्यपद्धतीची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे पोलीस निरीक्षक मोरे यांनी सोप्या भाषेत दिल्याने विद्यार्थ्यांमधील पोलिसांविषयीची भीती दूर होण्यास मदत झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. बी. गाढे यांनी केले.

यावेळी धाड पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी छाया गोमलाडू व वैशाली रमेश कोरडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव निर्मला ताई तायडे, तसेच विद्यालयाचे शिक्षक एस. पी. वारे, जे. बी. कोल्हे, के. आर. कांडेले, एस. बी. पवार, ए. ए. जेऊघाले, राऊत मॅडम, एस. यू. पालकर, एस. ए. भिवसनकर, पी. के. सावळे, यू. आर. मघाडे, ए. एस. शिंदे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top