Akola lawyers support: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत रिपब्लिकन सेना अॅडव्होकेट फोर्स (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या वतीने गुरुवारी (२३ जुलै) जिल्हाधिकारी, अकोला यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

रिपब्लिकन सेना अॅडव्होकेट फोर्सचे निवेदन; विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध
राहुल सोनोने
अकोला : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत रिपब्लिकन सेना अॅडव्होकेट फोर्स (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या वतीने गुरुवारी (२३ जुलै) जिल्हाधिकारी, अकोला यांच्यामार्फत मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
रिपब्लिकन सेना अॅडव्होकेट फोर्सने दिलेल्या निवेदनात, सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटीविरोधी विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला. तसेच २० जुलै २०२६ रोजी दिल्ली पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
निवेदनात विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आंदोलनकर्त्यांच्या न्याय्य मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन संवाद साधावा आणि योग्य निर्णय घ्यावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर अॅड. जी. एस. तेलगोटे, अॅड. सतीश आठवले, अॅड. जितेश तायडे, अॅड. अमित तेलगोटे, अॅड. अभिजित इंगळे, अॅड. जितेंद्र बगाटे, अॅड. संजय हिवराळे, अॅड. नागेश धाडसे, अॅड. संतोष रामटेके, अॅड. अजय गवई, अॅड. एच. डी. गवई, अॅड. मोहन सरदार, अॅड. सौरभ तेलगोटे, अॅड. विजय खंडारे आणि अॅड. एस. सी. जाधव यांच्यासह अनेक विधिज्ञांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
राजकीय निरीक्षकांच्या मते, नीट पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा आता केवळ विद्यार्थी संघटनांपुरता मर्यादित न राहता विविध सामाजिक, कायदेविषयक आणि राजकीय संघटनांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रश्नावर जनमत अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

