Devanand Gahile : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने अकोला येथे रविवारी (दि. १९ जुलै) आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांचा उल्लेखनीय पत्रकारिता, संघटनात्मक कार्य आणि सामाजिक योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.

पत्रकारिता व सामाजिक योगदानाचा गौरव; पातुरच्या पत्रकारितेचा राज्यस्तरावर गौरव
पातुर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने अकोला येथे रविवारी (दि. १९ जुलै) आयोजित राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशनात पातुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार देवानंद गहिले यांचा उल्लेखनीय पत्रकारिता, संघटनात्मक कार्य आणि सामाजिक योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
राज्यभरातील पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या अधिवेशनात पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत गहिले यांना सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, ज्येष्ठ पत्रकार गजानन वाघमारे तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.
देवानंद गहिले यांनी पत्रकारितेबरोबरच साहित्य, समाजसेवा, सांस्कृतिक आणि गायन क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये समाजरत्न पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार, स्वामी विवेकानंद प्रेरणा पुरस्कार, नैतिकता पुरस्कार, अंकुररत्न पुरस्कार, संघर्ष पुरस्कार, ‘मॅन ऑफ द इयर–1997’, कोरोना योद्धा पुरस्कार, वारकरी सेनेचा पुरस्कार तसेच साहित्य, सामाजिक कार्य आणि गायन क्षेत्रातील अनेक सन्मानांचा समावेश आहे.
या सन्मानामुळे पातुर तालुक्यातील पत्रकारितेचा गौरव राज्यस्तरावर अधोरेखित झाला असून पत्रकार, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी देवानंद गहिले यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या कार्यातून नवोदित पत्रकारांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय अधिवेशनात झालेल्या या गौरवामुळे पातुर तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्राची प्रतिष्ठा अधिक उंचावली असून, देवानंद गहिले यांच्या कार्याबद्दल विविध स्तरांतून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

