Mahabreaking

[breaking_news]

Auspicious arrival  :गुरुजी हमारे आए हैं जयघोषात लोणारात साध्वी सौम्यप्रज्ञाश्रीजी म.सा. यांचे मंगल आगमन

Auspicious arrival  : “गुरुजीय म्हारो अंतरनाथ, हमने आपो आशीर्वाद… गुरुजी हमारे आए हैं, नई रोशनी लाए हैं…” या मंगल जयघोषाने मंगळवारी सकाळी लोणार शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संप्रदायाच्या परम पूज्य साध्वी सौम्यप्रज्ञाश्रीजी म.सा. आदी ठाणा ७ यांचे चातुर्मासानिमित्त लोणार शहरात मंगल आगमन झाल्याने जैन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Auspicious arrival

  चातुर्मासासाठी लोणार सज्ज; जैन समाजात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण

लोणार : “गुरुजीय म्हारो अंतरनाथ, हमने आपो आशीर्वाद… गुरुजी हमारे आए हैं, नई रोशनी लाए हैं…” या मंगल जयघोषाने मंगळवारी सकाळी लोणार शहर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संप्रदायाच्या परम पूज्य साध्वी सौम्यप्रज्ञाश्रीजी म.सा. आदी ठाणा ७ यांचे चातुर्मासानिमित्त लोणार शहरात मंगल आगमन झाल्याने जैन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंतरिक्ष पार्श्वनाथ तीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिरपूर येथून पायी विहार करत आलेल्या साध्वी भगवंतांचा संघ सकाळी लोणी मार्गे लोणार शहरात दाखल झाला. शहराच्या प्रवेशद्वारापासून जैन समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती आणि बालकांनी पारंपरिक मंगल गजर, “नमो अरिहंताणं” आणि *”जय गुरुदेव”*च्या घोषणांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माने भारावून गेला होता.

यानंतर संत खटकेश्वर महाराज संस्थान परिसरातून हिरडव रोडवरील बन्सीलाल नगर येथे साध्वी भगवंतांचा विहार झाला. येथे सुभाषचंद बन्सीलाल संचेती यांच्या निवासस्थानी साध्वी भगवंतांचा पुढील चार दिवस मुक्काम राहणार आहे. संचेती परिवाराने पुष्पवृष्टी, मंगल आरती आणि वंदन करून त्यांचे भक्तिभावाने स्वागत केले.

२४ जुलै रोजी चातुर्मास प्रवेश सोहळा

यंदाचा चातुर्मास लोणार येथे होत असल्याने जैन समाजात विशेष आनंदाचे वातावरण आहे. २४ जुलै २०२६ रोजी स्थानिक आनंद मंगल भवन येथे साध्वी भगवंतांचा विधिवत चातुर्मास प्रवेश सोहळा संपन्न होणार असून, या सोहळ्यासाठी परिसरातील विविध गावांतील जैन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

चार महिने विविध धार्मिक उपक्रम

जैन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक कालखंड मानल्या जाणाऱ्या चातुर्मासादरम्यान साधू-साध्वी एका ठिकाणी स्थिर राहून धर्मप्रभावना करतात. या काळात प्रभूभक्ती, पूजा, प्रतिक्रमण, नवकार महामंत्र जप, स्वाध्याय, प्रवचने, तपसाधना, सामायिक, आयंबिल, उपवास तसेच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

चातुर्मासाच्या निमित्ताने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच भाविक धर्मआराधनेसाठी सज्ज झाले असून, मंदिर परिसरासह विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

आज झालेल्या मंगल आगमन सोहळ्यात जैन समाजातील मान्यवर, महिला मंडळ, युवक मंडळ, बालसंस्कार गट तसेच परिसरातील असंख्य भाविक सहभागी झाले होते. दिवसभर साध्वी भगवंतांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.

साध्वी सौम्यप्रज्ञाश्रीजी म.सा. यांच्या आगमनामुळे लोणार शहरात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी चार महिन्यांचा चातुर्मास कालखंड धर्मप्रबोधन, आत्मशुद्धी आणि संयम साधनेचा पर्व ठरणार असल्याची भावना जैन समाजातील भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top