Mahabreaking

[breaking_news]

Eicher truck rams into car :डोणगावजवळ आयशरची कारला जोरदार धडक; ७५ वर्षीय वकील जखमी, लाखोंचे नुकसान

Eicher truck rams into car : मेहकर–डोणगाव मार्गावरील हिवरा साबळे फाट्याजवळ आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ७५ वर्षीय वकील जखमी झाले असून, त्यांच्या कारचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

Eicher truck rams into car

एअरबॅगमुळे बचाव! डोणगावजवळ भीषण अपघातात वकिलाचा जीव थोडक्यात बचावला

डोणगाव : मेहकर–डोणगाव मार्गावरील हिवरा साबळे फाट्याजवळ आयशर टेम्पोने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ७५ वर्षीय वकील जखमी झाले असून, त्यांच्या कारचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅड. सुरेशराव काशीनाथ वानखेडे (वय ७५, रा. शिवाजीनगर, ता. मेहकर, जि. बुलढाणा) हे त्यांच्या ताब्यातील होंडा बीआर-व्ही कार (क्र. एमएच २८ एएन ५८५५) ने मेहकरहून बेलगावकडे जात होते. त्यावेळी हिवरा साबळे फाट्याजवळ मेहकरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर वाहनाने (क्र. एमएच १४ एलएल २६१५) त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली.

या अपघातात अॅड. वानखेडे यांच्या छातीला मुका मार लागला असून, मानेला (गर्दन) झटका बसल्याने ते जखमी झाले. तसेच त्यांच्या कारचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

एअरबॅगमुळे मोठी दुर्घटना टळली

अपघात होताच कारमधील एअरबॅग तत्काळ उघडल्याने अॅड. वानखेडे यांचा जीव थोडक्यात बचावला. अपघाताची तीव्रता लक्षात घेता एअरबॅगमुळे संभाव्य गंभीर दुखापत टळल्याचे सांगितले जात आहे.

याप्रकरणी अॅड. सुरेशराव वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५(अ), ३२४(४) व ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास डोणगाव पोलीस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top