Mahabreaking

[breaking_news]

Crackdown :मलकापूरात बालकामगारांविरोधात धडक कारवाई; तीन बालकामगारांची मुक्तता, दोन आस्थापनांवर गुन्हे

Crackdown : बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ (सुधारणा २०१६) अंतर्गत जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत कृतीदलाने मलकापूर शहरात धडक कारवाई करत दोन आस्थापनांमधून तीन बालकामगारांची मुक्तता केली. संबंधित आस्थापनांच्या चालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे बालकामगार ठेवणाऱ्या आस्थापनांमध्ये खळबळ उडाली आहे.

Crackdown

 बालमजुरीला प्रशासनाचा दणका; मलकापूरातील दोन गॅरेजवर गुन्हे, तीन बालकामगारांची सुटका

बुलढाणा : बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, १९८६ (सुधारणा २०१६) अंतर्गत जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत कृतीदलाने मलकापूर शहरात धडक कारवाई करत दोन आस्थापनांमधून तीन बालकामगारांची मुक्तता केली. संबंधित आस्थापनांच्या चालकांविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून या कारवाईमुळे बालकामगार ठेवणाऱ्या आस्थापनांमध्ये खळबळ उडाली आहे.

A golden career opportunity

बालकामगार या सामाजिक अनिष्ट प्रथेचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने १५ जुलै रोजी मलकापूर शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान फकीरपुरा, पारपेठ येथील शहादत खान शौकत खान यांच्या मल्टी ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिस, शिवाजीनगर-मुक्ताईनगर रोड येथील आस्थापनात एक बालकामगार काम करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच मोमीनपुरा, पारपेठ येथील सोहिल खान मेहबूब खान यांच्या ख्वाजा गरीब नवाज गॅरेज, मुक्ताईनगर रोड येथील आस्थापनात दोन बालकामगार काम करत असल्याचे आढळून आले.

कृतीदलाने तातडीने तिन्ही बालकामगारांची मुक्तता करून त्यांच्यासाठी आवश्यक संरक्षणात्मक प्रक्रिया पूर्ण केली. तसेच संबंधित आस्थापना चालकांविरुद्ध बालकामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमांतर्गत मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

कामगार विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही आस्थापनात बालकामगार किंवा किशोरवयीन कामगारांकडून बेकायदेशीररीत्या काम करून घेतले जात असल्याचे आढळल्यास त्याची माहिती पोलीस किंवा सरकारी कामगार अधिकाऱ्यांना द्यावी. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अधिनियमाच्या कलम १४ नुसार कठोर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे बालकामगार ही सामाजिक अनिष्ट प्रथा पूर्णपणे नष्ट करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही बालकाला कामावर ठेवू नये, असे आवाहन सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी केले आहे.

ही कारवाई कामगार उपआयुक्त चंद्रकांत राऊत (अमरावती) यांच्या निर्देशानुसार आणि कामगार अधिकारी शैलेश देशमुख (बुलढाणा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दुकाने निरीक्षक योगेश गोटे (मलकापूर) यांनी कारवाईचे नेतृत्व केले. या पथकात दुकाने निरीक्षक राजेश वणारे (खामगाव), सतीश देशमुख (मेहकर), महिला व बालविकास विभागाचे निलेश चौथनकर, अशोक डोळस, तसेच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख मतीन शेख मुकीम आणि कैलास शिवाजी सोनोने यांचा सहभाग होता.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top