Mahabreaking

[breaking_news]

State-level brainstorming session: पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांवर अकोल्यात राज्यस्तरीय मंथन; १९ जुलैला भव्य पत्रकार अधिवेशन

State-level brainstorming session: पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तसेच गुणवंत पत्रकारांचा गौरव या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी अकोला येथे भव्य राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, चर्चासत्र आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

State-level brainstorming session

  पत्रकार सुरक्षा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अन् गुणवंतांचा गौरव; अकोल्यात राज्यभरातील पत्रकारांचा मेळावा

प्रा.अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा : पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने, पत्रकारांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना तसेच गुणवंत पत्रकारांचा गौरव या दुहेरी उद्देशाने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी अकोला येथे भव्य राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन, चर्चासत्र आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अकोला येथील नवीन बसस्थानकाजवळील हॉटेल कृष्णा इम्पेरियल येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत होणाऱ्या या एकदिवसीय अधिवेशनात राज्यभरातील पत्रकार, संपादक, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी राहणार आहेत. यावेळी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, खासदार अनुप धोत्रे, खासदार रणधीर सावरकर, डॉ. विश्वासराव आरोटे, आमदार नितीन देशमुख, आमदार हरीश पिंपळे, आमदार साजिद खान पठाण, आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार नारायण गव्हाणकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, प्रकाश तायडे, सेवकराम ताथोड, डॉ. संतोष हुसे, श्रीकृष्ण अंधारे, संदीपदादा पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

अधिवेशनातील प्रमुख आकर्षण म्हणून दुपारी १२ वाजता “पत्रकारांवरील वाढते हल्ले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिस्तभंगाची कारवाई” या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक निरंजन टकले, एबीपी माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, हल्ला विरोधी कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, एएनएन न्यूजचे संपादक निलेश धाडीकर, वंचितचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे तसेच सामाजिक प्रवक्ते निरंजन शिरसाट मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी ३ वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रदेशाध्यक्ष नयन मोंढे राहणार असून प्रा. महेश पानसे, किशोर रायसाकडा, नवनाथ जाधव, वैभव स्वामी, मधुकर बावणे, अलका पचारे, अनुप भार्गव, हरिदास भदे, माजी आमदार गजानन वाघमारे, विवेक राऊत, विजय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.

या प्रसंगी जीवन गौरव, दीपस्तंभ, उत्कृष्ट पत्रकारिता, जिजाऊ पत्रकारिता, आरोग्य पत्रकारिता, युद्धवार्ता पत्रकारिता, तिसरा डोळा पत्रकारिता, विवेकवादी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती, आदर्श शिक्षक आणि शेतकरी कृषी पुरस्कार अशा विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी पत्रकार व विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या प्रदेश, विभागीय आणि जिल्हाध्यक्षांचा गौरव करण्यात येणार असून तालुकाध्यक्षांना संघटनेच्या वतीने साहित्याचे वितरणही करण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व पत्रकारांनी या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून पत्रकार सुरक्षा, पत्रकार एकजूट आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन अकोला जिल्हाध्यक्ष गणेश सुरजुसे तसेच देवानंद गहिले, प्रदीप गावंडे, संजय उमक आणि वानखडे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top