Mahabreaking

[breaking_news]

   Invitation extended :आषाढी एकादशीच्या प्रशासकीय महापूजेसाठी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निमंत्रण

Invitation extended : श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे आषाढी एकादशी पर्वानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक प्रशासकीय महापूजेसाठी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना सेवा समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.

   Invitation extended

  श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थानतर्फे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांची सदिच्छा भेट

प्रा.अशोक डाेईफोडे 

देऊळगाव राजा : श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देऊळगाव राजा येथे आषाढी एकादशी पर्वानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पारंपरिक प्रशासकीय महापूजेसाठी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना सेवा समितीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले.

श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थानात गेल्या चार वर्षांपासून आषाढी एकादशीच्या पावन पर्वकाळात तहसीलदारांच्या हस्ते प्रशासकीय महापूजेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाही शनिवार, दि. २५ जुलै रोजी होणाऱ्या महापूजेनिमित्त सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले.

यावेळी सेवा समितीचे पंडितराव पाथरकर, संमती जैन, विजुभाऊ उपाध्ये, बळीराम मापारी (मामा), प्रकाश खांडेभराड, प्रकाश अहिरे, खरात साहेब तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीसंत नरहरीनाथ महाराज संस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम, महापूजा, भजन-कीर्तन आणि भाविकांच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती सेवा समितीच्या वतीने देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top