Mahabreaking

[breaking_news]

District Collector visits :एसआयआर कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा सिंदखेडराजा दौरा; मुदतीत कामे पूर्ण करण्याचे आदेश

District Collector visits : बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी सोमवारी सिंदखेडराजा तालुक्याचा दौरा करून सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एसआयआरची कामे अचूक, पारदर्शक आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

District Collector visits

  एसआयआरमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही; जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांचा इशारा

गजानन तिडके

सिंदखेडराजा  : बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी सोमवारी सिंदखेडराजा तालुक्याचा दौरा करून सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एसआयआरची कामे अचूक, पारदर्शक आणि विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंदखेडराजा येथे आगमनानंतर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर तहसील कार्यालयात महसूल, निवडणूक आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली.

दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी एसआयआर अंतर्गत सुरू असलेल्या नोंदणी, दस्तऐवज पडताळणी, डिजिटल नोंदी आणि मैदानी कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांनी त्यावर जागेवरच मार्गदर्शन केले आणि आवश्यक प्रशासकीय उपाययोजनांच्या सूचना दिल्या.

आढावा बैठकीत एसआयआर प्रक्रियेची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, डिजिटल नोंदींची प्रगती तसेच कामकाजातील अचूकतेचा त्यांनी सखोल आढावा घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. देवरे म्हणाले, “एसआयआर आणि निवडणूक प्रक्रिया अत्यंत संवेदनशील असून प्रत्येक काम अचूक व वेळेत पूर्ण झाले पाहिजे. कोणतीही तांत्रिक किंवा मानवी त्रुटी राहता कामा नये. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून विहित मुदतीत कामे पूर्ण करावीत. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.”

या बैठकीला उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गट विकास अधिकारी अजित बांगर, नायब तहसीलदार डॉ. प्रवीण कुमार वराडे, सायली जाधव, श्री. मुंडे, निवडणूक नायब तहसीलदार संदीप बंगाळे, गट शिक्षणाधिकारी स्वप्नील निकम, भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक काशिनाथ भोईर व रचना जाधव यांच्यासह महसूल, निवडणूक शाखा, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि संबंधित विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे एसआयआर प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, आगामी निवडणुकांसाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top