man commits suicide : शहरातील संजयनगर परिसरात ४२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव गणेश किसन हरकळ (वय ४२, रा. संजयनगर, देऊळगाव राजा) असे आहे.

संजयनगरातील दुर्दैवी घटना; पत्र्याखालील बल्लीला गळफास घेतल्याचे आढळले
गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील संजयनगर परिसरात ४२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (११ जुलै) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची (मर्ग) नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव गणेश किसन हरकळ (वय ४२, रा. संजयनगर, देऊळगाव राजा) असे आहे.
याप्रकरणी दिपक विकास जाधव (वय ३३, व्यवसाय-गॅरेज चालक, रा. सिव्हिल कॉलनी, देऊळगाव राजा) यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ते आपल्या मावसभाऊंना भेटण्यासाठी संजयनगर येथे गेले असता, गणेश हरकळ यांनी पत्र्याखालील लाकडी बल्लीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी मर्ग क्रमांक २९/२०२६ नोंदविण्यात आला असून, दाखल अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल सैयद मुसा यांनी कार्यवाही केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

