Mahabreaking

[breaking_news]

Veerashaiva Lingayat community :लोणारात वीरशैव लिंगायत समाजाचे स्वप्न साकार; सामाजिक सभागृहाचे उत्साहात लोकार्पण

Veerashaiva Lingayat community :लोणार येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुप्रतीक्षित ‘श्रीपाद जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी सभागृह’ या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण बुधवारी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. त्यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या या सभागृहामुळे समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले.

Veerashaiva Lingayat community

विकासात कधीच केला नाही जाती-पातीचा विचार – संजय रायमुलकर

लोणार : लोणार येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या बहुप्रतीक्षित ‘श्रीपाद जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी सभागृह’ या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण बुधवारी माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. त्यांच्या विकास निधीतून उभारण्यात आलेल्या या सभागृहामुळे समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले.

add

कार्यक्रमाला शिवछत्रपती मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदकिशोर मापारी, सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुणमामा दळवी, लोणार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. मिराताई मापारी, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषणभाऊ मापारी, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष आबेद खान, शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक मयूर रमेशचंद गोलेच्छा, नगरसेवक गजानन शालीकराम मापारी, अक्षय नंदकुमार इंगळे, काँग्रेसचे गटनेते नितीनभाऊ शिंदे, भाजपचे नगरसेवक शुभम देसाई यांच्यासह समाजातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर म्हणाले की, मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी सुमारे २,५०० कोटी रुपयांचा विकास निधी मागील दोन वर्षांत मंजूर करून आणण्यात आला. या निधीतून लोणार व मेहकर तालुक्यात विविध समाजांसाठी सामाजिक सभागृहे, सभामंडप तसेच लोणार येथील जैन समाजाच्या वर्धमान गौरक्षण संस्थेच्या ७ एकर जागेस संरक्षण भिंत आणि सामाजिक सभागृहासाठी २ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

“विकासकामे करताना मी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. नगरपालिकेत कोणत्याही पक्षाची सत्ता असो, शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केले. जिथे विकासाची गरज होती, तिथे तत्काळ निधी पोहोचविण्याचे काम केले,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, “सत्ता असो वा नसो, नगरविकास खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने मेहकर मतदारसंघातील विकासाची गती कायम राहणार आहे. त्यांच्या माध्यमातूनच मतदारसंघात महाराष्ट्रातील सर्वाधिक ११७ तलाठी कार्यालयांची कामे पूर्ण झाली.” मतदारसंघातील जनतेने दिलेल्या प्रेम आणि विश्वासामुळेच अनेक विकासकामे करता आली, अशी भावना व्यक्त करत भविष्यातही लोणार शहर आणि संपूर्ण मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमास वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष मंगेश शेटेसर, विश्वनाथकाका जितकर, बांधकाम सभापती अनिकेत मापारी,माजी नगरसेवक डॉ. डुकळे, अच्युत अप्पा बेंद्रे, संजय अप्पा खडक्कर, कमलेश शेटे, अशोक अप्पा खडक्कर, ओंकारअप्पा खूपसे, रमेशअप्पा भुक्कन, रविभाऊ भोजपत्रे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंगेश शेटे सर यांनी केले.

 

रमेशअप्पा केळकर यांच्या जागादानातून साकारले समाजाचे स्वप्न

वीरशैव लिंगायत समाजाकडून अनेक वर्षांपासून लोणार येथे सामाजिक सभागृहाची मागणी होत होती. मात्र जागेअभावी या कामाला विलंब होत होता. समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशअप्पा केळकर यांनी कोणताही मोबदला न घेता सभागृहासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या या उदात्त योगदानामुळे समाजासाठी भव्य सभागृह साकार होऊ शकले, ही आनंदाची बाब असल्याचे डॉ. रायमुलकर यांनी सांगितले. यावेळी रमेशअप्पा केळकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

 

धर्मपीठाला ‘क’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

यावेळी डॉ. रायमुलकर यांनी लोणार येथील श्रीमद जगद्गुरू पलसिद्ध धर्मपीठ (र. नं. A-289) या मठाला तीर्थस्थळाचा ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर तात्काळ पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक स्वर्गीय गणपत अप्पा खडक्कर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, “ते शेवटपर्यंत निष्ठावान शिवसैनिक राहिले. त्यांचे मार्गदर्शन कायम प्रेरणादायी राहिले,” अशा शब्दांत त्यांना आदरांजली वाहिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top