Mahabreaking

[breaking_news]

IDAs 7th Scientific Conference :अकोल्यात आयडीएचे ७ वे वैज्ञानिक अधिवेशन उत्साहात; एस्थेटिक डेंटिस्ट्रीवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

IDAs 7th Scientific Conference : इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए), अकोला (विदर्भ) शाखेतर्फे आयोजित ७ वे वैज्ञानिक विभागीय अधिवेशन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शाखेचे अध्यक्ष डॉ. रूपेश शाह यांच्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली आयोजित या अधिवेशनात राज्यभरातील दंतचिकित्सकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

IDAs 7th Scientific Conference

स्माईल डिझाइनपासून आधुनिक दंतचिकित्सेपर्यंत… अकोल्यात दंततज्ज्ञांचा ज्ञानमेळावा रंगला

अकोला : इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए), अकोला (विदर्भ) शाखेतर्फे आयोजित ७ वे वैज्ञानिक विभागीय अधिवेशन नुकतेच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शाखेचे अध्यक्ष डॉ. रूपेश शाह यांच्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली आयोजित या अधिवेशनात राज्यभरातील दंतचिकित्सकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

या अधिवेशनाचे प्रमुख वक्ते म्हणून मुंबई येथील प्रख्यात दंततज्ज्ञ डॉ. संदेश मयेकर उपस्थित होते. त्यांनी आधुनिक दंतचिकित्सेतील एस्थेटिक डेंटिस्ट्री आणि स्माईल डिझाइन या विषयांवर अत्यंत अभ्यासपूर्ण, समकालीन आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात दंतचिकित्सेतील सौंदर्यविषयक उपचारपद्धती, रुग्णांच्या अपेक्षा आणि आधुनिक उपचारपद्धतींचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले. त्यांच्या व्याख्यानाला उपस्थित दंतचिकित्सकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नवीन कोठारी आणि डॉ. तुषार वोरा होते. या शैक्षणिक अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनामागे संयोजक डॉ. राहुल कोठारी यांचे विशेष योगदान राहिले. कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि सुरळीत अंमलबजावणी यासाठी डॉ. राजवी शाह, डॉ. श्रद्धा देशपांडे, डॉ. अनंत हेडा, डॉ. विक्रांत भागवत, डॉ. सौरभ घुगे, डॉ. सचिन वानखडे, डॉ. रादड आणि डॉ. मल्होत्रा यांनी उल्लेखनीय परिश्रम घेतले.

या अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणारे सर्व प्रतिनिधी, आयडीए सदस्य, आयोजन समिती, प्रायोजक, प्रदर्शक, स्वयंसेवक आणि हितचिंतकांचे शाखेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी आयडीए अकोला (विदर्भ) शाखेचे अध्यक्ष डॉ. रूपेश शाह, सचिव डॉ. गिरीश राठी आणि खजिनदार डॉ. सर्वेश खोरिया यांनी भविष्यातही अशाच दर्जेदार शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून दंतचिकित्सकांच्या ज्ञानवृद्धीसाठी आणि रुग्णसेवेच्या गुणवत्तावाढीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top