Mahabreaking

[breaking_news]

  Rural Hospital :साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी; उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

Rural Hospital : येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी सोमवारी (दि. ६ जुलै) माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केली. यावेळी काही कामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने संबंधित विभागाला त्या तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.

Rural Hospital

  १५ ऑगस्टपूर्वी रुग्णालय सुरू करण्यासाठी हालचाली वेगात; जिल्हा शल्य चिकित्सक व माजी आमदारांची पाहणी

साखरखेर्डा : येथील ग्रामीण रुग्णालयाची पाहणी सोमवारी (दि. ६ जुलै) माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केली. यावेळी काही कामांमध्ये त्रुटी आढळून आल्याने संबंधित विभागाला त्या तत्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले.

साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालय सुरू व्हावे आणि रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. २०१४ मध्ये डॉ. शशिकांत खेडेकर आमदार झाल्यानंतर त्यांनी साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न सातत्याने विधिमंडळात मांडत मंजुरी मिळवून दिली. त्यानंतर रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री Eknath Shinde यांच्याकडून खास बाब म्हणून १४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला.

इमारतीचे बांधकाम सुरू असताना निवासस्थान बांधकामासाठी पुन्हा ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आणि ते कामही पूर्ण करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा (फायर फायटिंग सिस्टीम) आवश्यक असल्याने रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने डॉ. खेडेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणखी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आणि ते कामही पूर्ण करण्यात आले.

रुग्णालयासाठी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी डॉ. खेडेकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयातील २६ पदांच्या भरतीसाठी शासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. १५ ऑगस्टपूर्वी रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली वेगाने सुरू असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आज संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

येत्या १५ दिवसांत उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन वाघ, कनिष्ठ अभियंता संतोष आढाव आणि कनिष्ठ अभियंता अनिल बढे यांनी दिले. माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पुढाकारामुळे हे ग्रामीण रुग्णालय सुरू होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाबूराव मोरे, शिवसेना जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी, युवा सेना तालुका प्रमुख संदीप मगर, माजी सरपंच तसेच साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष चंद्रशेखर शुक्ल, दिलीप सोभागे, विठ्ठल गायकवाड आणि संदीप खिल्लारे उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top