Mahabreaking

[breaking_news]

murder :दुचाकीची धडक अन् चाकूचे सपासप वार; काँग्रेस नगरसेविकेच्या पतीच्या हत्येने अकोला हादरले

murder : शहरातील स्टेशन रोड परिसरात मंगळवारी भरदिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्यात काँग्रेसच्या नगरसेविका रफिया बी. याकूब खान यांचे पती याकूब खान पहेलवान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे. रामदासपेठ पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

murder

स्टेशन रोडवर थरारक हल्ला; काँग्रेस नगरसेविकेच्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

अकोला : शहरातील स्टेशन रोड परिसरात मंगळवारी भरदिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्यात काँग्रेसच्या नगरसेविका रफिया बी. याकूब खान यांचे पती याकूब खान पहेलवान यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे. रामदासपेठ पोलिसांनी या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास याकूब खान पहेलवान हे रेल्वे स्थानक परिसरात चहा घेतल्यानंतर स्टेशन रोडमार्गे नवाबपुरा येथील आपल्या घरी जात होते. यावेळी रामदासपेठ पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर समोरून भरधाव आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडकेनंतर हल्लेखोराने धारदार शस्त्राने याकूब खान यांच्यावर सपासप वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी याकूब खान यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य, नियोजित कट किंवा अन्य कोणते कारण आहे, याचा तपास विविध अंगांनी केला जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेस नगरसेविकेच्या पतीची भरदिवसा हत्या झाल्याने राजकीय वर्तुळातही या घटनेची चर्चा सुरू झाली असून, शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मात्र हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिस तपासानंतरच संपूर्ण चित्र समोर येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top