Demand for action : पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या लोकसभा खासदार संजय पाटील यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अकोला तालुका ग्रामीण पत्रकार संघ, बोरगाव मंजू यांच्या वतीने बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

ग्रामीण पत्रकार संघाचे बोरगाव मंजू पोलिसांना निवेदन; अन्यथा आंदोलनाचा इशारा
बोरगाव मंजू :पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या लोकसभा खासदार संजय पाटील यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अकोला तालुका ग्रामीण पत्रकार संघ, बोरगाव मंजू यांच्या वतीने बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, लोकसभा खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित धमकीजनक वक्तव्याची माहिती विविध माध्यमांतून समोर आली आहे. पत्रकारांना अशा प्रकारे धमकावणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट आघात असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला बाधा आणणारे कृत्य असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
पत्रकार हे समाज आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करत असतात. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्याचे काम पत्रकार करत असल्याने त्यांना धमक्या देणे, दबाव टाकणे किंवा त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणे हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामीण पत्रकार संघाने केली आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.
या निवेदनावर अकोला तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांमध्ये संजय भाऊ वानखडे, संजय तायडे (गुरुजी), संतोष चक्रनारायण, संतोष गवई, रविंद्र ढवळे, आकाश डोगरे, योगेश विजयकर, मुन्ना भाऊ वाडेवाले, समाधान वानखडे, डॉ. राजकुमार वैराळे, संदीप सोनोने, पंकज शेंडे, विनोद ठोंबरे, ओशामा शहा, मो. शारिक भाई, दिनेश छबिले, सिद्धार्थ पाटील, मनीष तिवारी, सुनील सावळकर आणि रमेश समुद्रे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

