Mahabreaking

[breaking_news]

Wadegaon resounds:’गण गण गणात बोते’च्या जयघोषात दुमदुमले वाडेगाव; श्रींच्या पालखीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Wadegaon resounds: “पाऊले चालती पंढरीची वाट…” या अभंगाचा प्रत्यय देणारी शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पायी पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, गुरुवार (दि. २५ जून) रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता वाडेगाव येथे तिचे उत्साहात आगमन झाले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही भाविकांचा उत्साह आणि भक्तिभाव कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Wadegaon resounds

आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा; वाडेगावात श्रींच्या पालखीचे भव्य स्वागत, हजारोंनी घेतला महाप्रसाद

राहुल सोनोने

वाडेगाव : “पाऊले चालती पंढरीची वाट…” या अभंगाचा प्रत्यय देणारी शेगाव येथील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पायी पालखी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, गुरुवार (दि. २५ जून) रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता वाडेगाव येथे तिचे उत्साहात आगमन झाले. मुसळधार पाऊस सुरू असतानाही भाविकांचा उत्साह आणि भक्तिभाव कायम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पालखीचे वाडेगावात आगमन होताच वारकरी संप्रदाय, भजनी मंडळे आणि ग्रामस्थांनी टाळ-मृदंगाच्या गजरात तसेच “माऊली… माऊली…” आणि “गण गण गणात बोते” या जयघोषात श्रींचे भव्य स्वागत केले. पावसाची पर्वा न करता परिसरातील तसेच पंचक्रोशीतील हजारो महिला, पुरुष, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी श्रींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सुयोग्य नियोजनामुळे भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता आले.

पालखी आगमनानंतर श्री गजानन महाराजांची पालखी स्थानिक श्री जागेश्वर विद्यालयात दर्शनासाठी विराजमान करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखीसोबत आलेल्या शेकडो वारकऱ्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था कंडारकर परिवाराने केली होती. तसेच ‘माऊली ग्रुप’ आणि ग्रामस्थांच्या वतीने गावातील व पंचक्रोशीतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

महाप्रसादाच्या आयोजनासाठी गणेश पाटील मानकर, संदीप जढाळ, अभय घाटोळ, गणेश मसने, दीपक सरप (मेजर), ज्ञानेश्वर म्हैसने, अंकुश शाहणे, विकास मानकर, एन. डी. चिंचोलकार, अनंता धनोकार, प्रविण वाढोकार, अक्षय मसने, नारायण कौसकार, वैभव घाटोळ, प्रविण लोखंडे, मनोज उजाळे, अनिरुद्ध घाटोळ, विजय सरप, उगेश घाटोळ, मुकिंदा नावकार, प्रवीण जावरकार, अविनाश भारसाकळे, सुश्रुत भुस्कुटे, ज्ञानेश्वर चिंचोलकार, अजय लोखंडे, पवन हुसे, अनिकेत लोखंडे, भगवान मसने, गणेश गोतमारे, निलेश चिंचोळकर यांच्यासह अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

चोख पोलीस बंदोबस्त

पालखी सोहळ्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस विभागाने विशेष खबरदारी घेतली होती. बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद शेदाणे यांच्यासह १० अधिकारी, ४० पोलीस कर्मचारी आणि ३० होमगार्ड तैनात करण्यात आले होते.आज (शुक्रवारी) सकाळी श्री गजानन महाराजांची पालखी पुढील मुक्कामासाठी पातूरकडे मार्गस्थ झाली. भक्ती, सेवा, शिस्त आणि सामाजिक एकोप्याचा संगम अनुभवायला मिळाल्याने वाडेगावातील पालखी सोहळा अविस्मरणीय ठरला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top