soybeans per acre: बाळापूर तालुक्यातील सुमारे ८० टक्के शेतांमध्ये सोयाबीनची मळणी पूर्ण झाली आहे. मात्र सरासरी प्रति एकर फक्त दोन ते तीन क्विंटलच उत्पादन निघाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी दानाही पडला नाही. त्यातच हार्वेस्टरचा खर्चही खिशातूनच करावा लागला. हा खर्च टाळण्यासाठी काही शेतकऱ्यांनी उभे पीक पेटवून दिले, तर काहींनी जनावरे चारून ट्रॅक्टर फिरवले. त्यामुळे यंदा बाळापूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चित्र अतिशय विदारक दिसत आहे.

सोयाबीनची मळणी, हार्वेस्टरचा खर्चही खिशातूनच
बाळापूर : बाळापूर तालुक्यातील सुमारे ८० टक्के शेतांमध्ये सोयाबीनची मळणी पूर्ण झाली आहे. मात्र सरासरी प्रति एकर फक्त दोन ते तीन क्विंटलच उत्पादन निघाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पदरी दानाही पडला नाही. त्यातच हार्वेस्टरचा खर्चही खिशातूनच करावा लागला. हा खर्च टाळण्यासाठी काही शेतकऱ्यांनी उभे पीक पेटवून दिले, तर काहींनी जनावरे चारून ट्रॅक्टर फिरवले. त्यामुळे यंदा बाळापूर तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे चित्र अतिशय विदारक दिसत आहे.
सोयाबीनचे उत्पादन हातचे गेल्याने शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. दिवाळी तर अंधारात गेलीच, पण आता रब्बी हंगामाचे नियोजन करायचे तरी कसे, हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. शासनाची मदत मात्र नेहमीप्रमाणे “वराती मागून घोडे” या म्हणीसारखीच उशिरा पोहोचते.
गेल्या चार-पाच वर्षांपासून सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या अतिवृष्टीचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच कापसाच्या उत्पादनातही घट होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकटाचे ढग कायम घोंगावत आहेत. यंदा तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले आहे.
अस्मानी आणि सुलतानी दुहेरी संकट
निसर्गाच्या कोपामुळे सोयाबीनचे उत्पादन पूर्णपणे नेस्तनाबूत झाले. तरीही ज्यांचे थोडेफार उत्पादन हाती आले, त्यांनाही हमीभावासाठी झगडावे लागत आहे. पावसामुळे सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक असल्याने बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. हमीभाव तर दूरच, सध्या बाजारभाव फक्त २,५०० ते ४,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे.
मळणीचा खर्चही निघणे कठीणअतिवृष्टीमुळे शेतात गवताचे प्रमाण वाढले आणि शेंगाही व्यवस्थित भरल्या नाहीत. परिणामी, उत्पादन कमी असूनही शेतकऱ्यांना हार्वेस्टरच्या सहाय्याने मळणी करावी लागली. काहींनी थेट ट्रॅक्टरच्या साह्याने मशागत केली. त्यामुळे जनावरांचा चारा हिरावला आणि हार्वेस्टरचा खर्चही खिशातूनच गेला.– अशोक उमाळे, बाळापूरशेंगा वाळल्या, पण पाला हिरवागारगेल्या काही दिवसांपासून बाळापूर तालुक्याच्या उत्तर भागात उघाड पडल्याने तापमानात वाढ झाली आहे. परिणामी झाडावरील बारीक आणि पोचट शेंगा वाळून झुरर झाल्या, मात्र जमिनीत अद्याप आर्द्रता असल्याने झाडांची पाने हिरव्या आहेत. यामुळे कापणीस विलंब झाला असून शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साह्याने मळणी केली.– वासुदेव खारोडे, निंबा
मजुरांचे हात रितेच…अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक मातीमोल झाले. त्यामुळे कापणीसाठी फारसे काम उपलब्ध नाही. जमिनीत ओलावा असल्याने कापसाची बोंडेही उकलत नाहीत. परिणामी मजुरांच्या हाताला कामच नाही; त्यांच्या घरची दिवाळीही अंधारात गेली. दरवर्षी दिवाळीपूर्वीच कापूस वेचणी सुरू होत असे, पण यंदा लक्ष्मीपूजनालाही नवीन कापूस दिसला नाही.– संजय रोहणकार, अंदुरा“सांगा साहेब, जगायचं कसं?”“यंदा खरिपाच्या हंगामापासूनच आम्हा शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागली आहे. सुरूवातीला पावसाअभावी सोयाबीन उगवले नाही, त्यामुळे दुबार पेरणी करावी लागली. कसाबसा पीक वाचविले, पण ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीने ते पूर्णपणे नष्ट केले. झाडाला काही प्रमाणात शेंगा आल्या तरी दाणे भरलेच नाहीत. मळणीचा खर्चही निघत नव्हता, त्यामुळे उभ्या पिकातच ट्रॅक्टर फिरवावा लागला.”– नामदेव वैराळे, शेतकरी, बोरगाव वैराळे

