Mahabreaking

[breaking_news]

hard work: यशासाठी चिकाटी आणि कठोर मेहनत हाच मंत्र : पीएसआय शरद शेंदाणे

hard work: बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील श्री जागेश्वर कोचिंग क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नुकतीच मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.

hard work

 वाडेगावात मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

राहुल सोनोने

 वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील श्री जागेश्वर कोचिंग क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नुकतीच मोफत करिअर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन करण्यात आले असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला.

add

आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी यश संपादन करायचे असेल तर चिकाटी, शिस्त आणि कठोर मेहनतीला पर्याय नाही, असे प्रतिपादन वाडेगाव पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) शरद शेंदाणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना ध्येय निश्चिती, वेळेचे नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व पटवून दिले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील म्हैसने यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकत वाडेगाव पंचक्रोशीच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीविषयी माहिती दिली.

add

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील मानकर यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वाडेगावचे उपसरपंच सुनील घाटोळ तसेच क्लासचे प्राध्यापक संजय घाटोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. करिअर मार्गदर्शनासंदर्भात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवरून त्यांची जागरूकता आणि भविष्याबाबतची गंभीरता दिसून आली.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत लोथे यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. नितीन मानकर यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील पालक व नागरिकांनी श्री जागेश्वर कोचिंग क्लासेसच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top