administrative drive :जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी मोठे फेरबदल करत तब्बल 51 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांचा समावेश असून अनेक पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी अधिकारी मिळाले आहेत.

बुलढाणा जिल्हा पोलीस दलात व्यापक बदल; तब्बल 51 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
बुलढाणा : जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी मोठे फेरबदल करत तब्बल 51 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) व पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) यांचा समावेश असून अनेक पोलीस ठाण्यांना नवे प्रभारी अधिकारी मिळाले आहेत.
या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंग पदमसिंग राजपूत यांची प्रभारी अधिकारी म्हणून अमडापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निखील बबनराव निर्मल यांची धामणगाव बढे, प्रवीण अरुणराव लिंगाडे यांची जलंब, दीपक दिनकराव ढोमणे यांची अंढेरा, युवराज धनराज रबडे यांची साखरखेर्डा, गजानन पिराजी सोनटक्के यांची बीबी, शरद सजन माळी यांची जानेफळ आणि गणेश अशोक इंगोले यांची डोणगाव येथे प्रभारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
याशिवाय भरत विठ्ठराव चापाईतकर यांची सिंदखेड राजा, राहुल पांडुरंग लोखंडे यांची चिखली, हेमराज भगवान कोळी यांची नांदुरा, आशिष नथुजी चेंचरे यांची बुलढाणा ग्रामीण, गजानन कोंडीबा कौळासे यांची लोणार येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप अन्नाजी गोंडाणे यांची नियंत्रण कक्ष बुलढाणा, नागेश रामदास जायले यांची मलकापूर शहर, अजिनाथ ओंकार मोरे यांची धाड, संदीप शिवाजी बिरांजे यांची दोषसिद्धी विभाग व डायल-112 तर राजेंद्र दशरथ पवार यांची शेगाव ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलातील या व्यापक फेरबदलांमुळे अनेक पोलीस ठाण्यांच्या नेतृत्वात बदल होणार असून कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारी नियंत्रणाच्या दृष्टीने या बदल्यांकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

