Mahabreaking

[breaking_news]

Imposter CBI officer :तोतया CBI अधिकारी १२ तासांत गजाआड ; एलसीबीची धडाकेबाज कारवाई

Imposter CBI officer : CBI अधिकारी असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याकडून जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आलेली तब्बल २५ लाख रुपयांची रोख रक्कम अवघ्या १२ तासांत हस्तगत करत अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी खामगाव येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम, मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

Imposter CBI officer

व्यापाऱ्याची लुटलेली २५ लाखांची रक्कम शंभर टक्के जप्त ; ५० CCTV, तांत्रिक विश्लेषण अन् खबऱ्यांची माहितीवरून लावला छडा

अकोला : CBI अधिकारी असल्याची बतावणी करून व्यापाऱ्याकडून जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आलेली तब्बल २५ लाख रुपयांची रोख रक्कम अवघ्या १२ तासांत हस्तगत करत अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या प्रकरणी खामगाव येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम, मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

add

बाळापूर पोलीस ठाण्यात १९ जून रोजी अपराध क्रमांक ४६८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३१८(१), २०४, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात खामगाव येथील एका व्यापाऱ्याला CBI अधिकारी असल्याची बतावणी करून बाळापूर येथे उतरविण्यात आले आणि त्याच्याकडील २५ लाख रुपयांची रोख रक्कम हिसकावून नेण्यात आली होती.

add

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना तपासाचे आदेश दिले. त्यानंतर तीन स्वतंत्र पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.

५० CCTV फुटेजची तपासणी

तपासादरम्यान एलसीबीच्या पथकाने खामगाव ते बाळापूर मार्गावरील सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटविण्यात यश आले. या प्रकरणात हार्दिक मनोजकुमार गुरबानी (वय २२, रा. सिंधी कॉलनी, खामगाव) आणि साहिल नंदकिशोर नथ्थानी (वय २५, रा. बीएचआर नगर, तलाव रोड, खामगाव) या दोघांना अटक करण्यात आली.

संपूर्ण रक्कम हस्तगत

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गुन्ह्यातील संपूर्ण २५ लाख रुपयांची रोख रक्कम, फिर्यादीचा अँड्रॉइड मोबाईल (१० हजार रुपये) असा एकूण २५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय आरोपींकडून दोन दुचाकी वाहने आणि दोन मोबाईल फोन असा आणखी २ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २७ लाख ५० हजार रुपये आहे.

एलसीबीच्या तपासाचे कौतुक

अत्यंत कमी वेळेत आरोपींचा शोध घेऊन संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात यश आल्याने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे विशेष कौतुक केले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल एलसीबी पथकाला २५ हजार रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.

संघटित तपासाचे यश

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, पोउपनि माजीद पठाण तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. दरम्यान, या गुन्ह्याचा पुढील तपास बाळापूर पोलीस ठाणे करीत असून आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top