Mahabreaking

[breaking_news]

Youth dies tragically :किनगाव जट्टू येथील गिट्टी खदान डोहात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Youth dies tragically : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील गिट्टी खदानीत साचलेल्या पाण्यात बुडून खंडाळा येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सागर हरिदास इंगळे (वय २९) रा. खंडाळा असे मृतक युवकाचे नाव आहे.

Youth dies tragically

 गुरे चारण्यासाठी गेला होता युवक ; परिसरात हळहळ

रमेश खंडागळे 

बीबी  : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथील गिट्टी खदानीत साचलेल्या पाण्यात बुडून खंडाळा येथील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सागर हरिदास इंगळे (वय २९) रा. खंडाळा असे मृतक युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किनगाव जट्टू येथे दोन स्टोन क्रशर प्रकल्प कार्यरत आहेत. या प्रकल्पांसाठी करण्यात आलेल्या गौण खनिज उत्खननामुळे परिसरात मोठमोठे खड्डे तयार झाले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या डोहांमध्ये आसपासच्या गावांतील नागरिक गुरांना पाणी पाजण्यासाठी तसेच काही युवक पोहण्यासाठी जात असल्याचे सांगितले जाते.

खंडाळा येथील सागर हरिदास इंगळे (वय २९) हा युवक 18 जून रोजी  सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास गुरे चारण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. दरम्यान, तो खदानीत पोहत असताना पाण्यात बुडाल्याची माहिती विजय जालिंदर कासार यांनी मयताचा भाऊ नितीन हरिदास इंगळे यांना दिली.

घटनेची माहिती मिळताच गावातील काही नागरिकांनी तत्काळ खदानीकडे धाव घेतली. शोध घेत असताना सागर इंगळे यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण करीत आहेत. दरम्यान, उत्खननामुळे तयार झालेल्या खोल डोहांमध्ये वारंवार अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता अशा ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top