New employment opportunity : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर घडविण्याची आणि स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध झाली असून ‘डिप्लोमा इन ॲक्युपंचर थेरपी’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाकडे युवकांचा कल वाढत आहे. महाराष्ट्र ॲक्युपंचर कौन्सिल, मुंबई तसेच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत असून स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा येथे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. मोजक्याच जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी त्वरीत आपले प्रवेश निश्चित करावे, असे संस्थापक डॉ. सचिन सुपे यांनी आवाहन केले आहे.

‘शिका आणि स्वतःचा व्यवसाय उभारा’; ॲक्युपंचर थेरपी अभ्यासक्रमातून रोजगाराच्या नव्या वाटा
बुलढाणा : बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आरोग्य क्षेत्रात करिअर घडविण्याची आणि स्वावलंबी होण्याची संधी उपलब्ध झाली असून ‘डिप्लोमा इन ॲक्युपंचर थेरपी’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाकडे युवकांचा कल वाढत आहे. महाराष्ट्र ॲक्युपंचर कौन्सिल, मुंबई तसेच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत असून स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा येथे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. मोजक्याच जागा शिल्लक असल्याने इच्छुकांनी त्वरीत आपले प्रवेश निश्चित करावे, असे संस्थापक डॉ. सचिन सुपे यांनी आवाहन केले आहे.

आरोग्य क्षेत्रात वाढती मागणी लक्षात घेता ॲक्युपंचर थेरपी हे एक उदयोन्मुख क्षेत्र म्हणून पुढे येत आहे. या अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी स्वतःची प्रॅक्टिस सुरू करून रुग्णसेवा करू शकतात. तसेच विविध आरोग्य केंद्रे, वेलनेस क्लिनिक आणि उपचार संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे बारावीनंतर पारंपरिक अभ्यासक्रमांव्यतिरिक्त पर्यायी करिअरचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वाचा पर्याय ठरत आहे.
ॲक्युपंचर ही औषधांविना उपचार करणारी पद्धत असून रोगाचे मूळ कारण शोधून त्यावर उपचार करण्यावर भर दिला जातो. गुडघेदुखी, खांदेदुखी, मानदुखी, पाठदुखी, कंबरदुखी तसेच सांध्यांशी संबंधित विविध समस्यांवर या उपचारपद्धतीचा उपयोग केला जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ऑपरेशन किंवा दीर्घकालीन औषधोपचार टाळण्यासाठी अनेक रुग्ण पर्यायी उपचार पद्धतीकडे वळत असल्याने प्रशिक्षित ॲक्युपंचर तज्ज्ञांची मागणी वाढत आहे.
महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक सुविधा, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, समृद्ध ग्रंथालय तसेच अनुभवी व उच्चशिक्षित प्राध्यापक वर्ग यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याचा दावा संस्थेने केला आहे. नियमित वर्गांसह भरपूर प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर विशेष भर दिला जातो.

प्रवेशासाठी टक्केवारीची अट नाही, रोजगाराभिमूख अभ्यासक्रम
विशेष म्हणजे प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण असणे हीच पात्रता असून कोणत्याही प्रकारची टक्केवारीची अट ठेवण्यात आलेली नाही. अत्यल्प शुल्कात उपलब्ध असलेल्या या अभ्यासक्रमात १०० टक्के प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सुविधा देण्यात येत असल्याचे महाविद्यालयाने म्हटले आहे. शासकीय नोकरीसाठी पात्र ठरणारे विविध अभ्यासक्रमही उपलब्ध असल्याने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स रोजगाराभिमुख पर्याय म्हणून समोर येत आहे.आरोग्य सेवा आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रांचा संगम साधणारा हा अभ्यासक्रम युवकांना कौशल्याधारित शिक्षणासह स्वावलंबनाचा मार्ग दाखवत असल्याचे स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणाचे संस्थापक डॉ.सचिन सुपे यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमासाला प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा
स्किल पॅरामेडिकल व अॅक्युपंक्चर कॉलेज अँड हॉस्पिटल, बुलढाणा
वानखेडे ले-आऊट,
डॉ. मेहेत्रे हॉस्पिटल जवळ,
रेणुका टायपिंग समोर, बुलडाणा
अधिक महितीसाठी संपर्क करा : 9422945811

