Mahabreaking

[breaking_news]

Crackdown on loafers :टवाळखोरांना चाप बसणार; देऊळगाव राजात ‘दामिनी पथक’ कार्यान्वित

Crackdown on loafers : पश्चिम विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव राजा शहरात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करण्यात आले असून, या पथकाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या उपस्थितीत बसस्थानक चौकात करण्यात आला.

Crackdown on loafers
महिला सुरक्षेसाठी पोलिसांचे पाऊल; देऊळगाव राजात २४ तास दामिनी पथक सज्ज

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : पश्चिम विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या देऊळगाव राजा शहरात महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरात ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करण्यात आले असून, या पथकाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या उपस्थितीत बसस्थानक चौकात करण्यात आला.
देऊळगाव राजा येथे अनेक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालये कार्यरत आहेत. राज्यासह परराज्यातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येत असतात. शहराबाहेरील वळण रस्ता, वाढती वर्दळ तसेच विविध वसतिगृहांमुळे महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांनी शहरासह विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार दामिनी पथके कार्यान्वित करण्यात येतील, असे सांगितले. महिलांनी व मुलींनी कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अत्याचार सहन न करता तात्काळ पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा. अशा तक्रारींची त्वरित दखल घेऊन नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देऊळगाव राजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी दामिनी पथक २४ तास कार्यरत राहणार असून महिला सुरक्षेसाठी विशेष लक्ष देणार असल्याची माहिती दिली.
या पथकात महिला पोलीस मीना बिलावेकर, महिला पोलीस मंगला बिथरे, वाहन चालक तसेच इतर कर्मचारी सहभागी असून शहरातील संवेदनशील ठिकाणे, शैक्षणिक संस्था परिसर आणि सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालण्यात येणार आहे.दामिनी पथकाच्या स्थापनेमुळे महिला, विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top