Mahabreaking

[breaking_news]

Patur Municipal Council :पातूर नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा; विकासासाठी ५० कोटींच्या निधीचे आश्वासन

Patur Municipal Council : पातूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा खासदार अनुप धोत्रे तर उद्घाटक म्हणून आमदार रणधीरभाऊ सावरकर उपस्थित होते. यावेळी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Patur Municipal Council

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनातून भाजपची शक्तीप्रदर्शन सभा; अनुप धोत्रे यांचे मतदारांना आवाहन

निशांत गवई

पातूर : पातूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा खासदार अनुप धोत्रे तर उद्घाटक म्हणून आमदार रणधीरभाऊ सावरकर उपस्थित होते. यावेळी भाजपच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

Patur Municipal Council

प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजप नेत्यांनी पातूर नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे आवाहन करत विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी संवाद साधला. शहराच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांनी भाजपला एक संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी पातूर नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यास शहराच्या विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केली. तसेच शहर सीमा विस्तार, एमआयडीसीसह विविध विकासात्मक प्रश्नांना प्राधान्य देत राज्य सरकारच्या सहकार्याने ते मार्गी लावण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार अनुप धोत्रे यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार तसेच भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. पातूरच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी मतदारांनी विकासाभिमुख नेतृत्वाला संधी द्यावी, असे सांगितले. कार्यक्रमात खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर, माजी महापौर विजय अग्रवाल आणि माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी मनोगत व्यक्त करून भाजपच्या विकासाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर विजय अग्रवाल, माजी आमदार बळीराम सिरस्कार, महानगराध्यक्ष जयंतराव मसने, ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जिल्हा सरचिटणीस अंबादास उमाळे, डॉ. अमित कावरे, माजी प्राचार्य विजयसिंह गहीलोत, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष गुलाब गाडगे, शेषराव फुलारी तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार सचिनभाऊ ढोणे उपस्थित होते. कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष कपिल खरप, पातूर मंडळ अध्यक्ष गणेश गाडगे, विवेक भरणे, किशोर कुचके, रमण जैन, प्रेमानंद श्रीरामे, भिकाभाऊ धोत्रे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top