Mahabreaking

[breaking_news]

Accused who abducted :अल्पवयीन मुलीस पळवून नेणारा वर्षभर फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Accused who abducted : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आणि सुमारे एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अकोला यांनी ताब्यात घेतले आहे. पातूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून आरोपीसह पीडित मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.

Accused who abducted

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई; पातूर येथील गुन्ह्यातील आरोपी ताब्यात

अकोला : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणाऱ्या आणि सुमारे एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अकोला यांनी ताब्यात घेतले आहे. पातूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून आरोपीसह पीडित मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.

पातूर पोलीस ठाण्यात अपराध क्र. १८४/२०२५, कलम १३७(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल असून त्याचा पुढील तपास ५ नोव्हेंबर २०२५ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अकोला यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी तसेच बाळापूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने पीडित मुलगी व आरोपीचा शोध घेण्यासाठी पुणे, मुंबई आणि नाशिक येथे प्रयत्न केले. मात्र सुरुवातीला त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता.

दरम्यान, पीडित मुलगी व आरोपी हे अकोल्यातील वाशिम बायपास चौक परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचला. आशापुरी हॉटेलसमोर एक युवक व एक युवती संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता युवकाने आपले नाव गौतम बाबुराव जाधव (वय २२ वर्षे, रा. कळंबेश्वर, पोस्ट निंबी मालोकार, ता. जि. अकोला) असे सांगितले.

तपासादरम्यान संबंधित युवक व युवती हे पातूर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी व पीडित असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोघांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अकोला येथे आणून आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात आली व पुढील तपासासाठी पातूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रभारी अधिकारी सपोनि कविता फुसे, महिला पोलीस हवालदार गीता अवचार, पोलीस हवालदार विशाल मोरे, वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ यादव तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहुल सानप यांनी केली. महिला व बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये पीडित मुली व आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यांचा तत्परतेने निपटारा करण्याचे काम अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षामार्फत सातत्याने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top