country-made pistols exposed : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा आणि दहीहंडा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अवैध अग्निशस्त्र निर्मिती व तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत देशी कट्टे तयार करणाऱ्या आरोपीकडून शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत मोठी कारवाई; मध्यप्रदेशातून शस्त्रनिर्मिती साहित्य हस्तगत
अकोला : पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा आणि दहीहंडा पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने अवैध अग्निशस्त्र निर्मिती व तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत देशी कट्टे तयार करणाऱ्या आरोपीकडून शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दि. ३० एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दत्ता मोहोड व अक्षय मोहोड यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक देशी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत शेख अकबर शेख हारूण याच्याकडून आणखी एक गावठी पिस्टल व जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले. या कारवाईत दोन गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण सुमारे २.२२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी किस्मतसिंग तकदीरसिंग (रा. पाचोरी, जि. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) याला अटक केली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार तो हरियाणातील एका आर्म्स अॅक्ट प्रकरणात फरीदाबाद येथील निमका कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दहीहंडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस कोठडी मिळवली.
पोलीस चौकशीत आरोपीने स्वतः देशी कट्टे तयार करत असल्याची कबुली दिली. त्यानुसार मध्यप्रदेशातील त्याच्या राहत्या घरातून शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये ग्राइंडर मशीन, लोखंडी करवत, छिन्नी, हातोडी, सांडशी तसेच इतर उपकरणांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीच्या साखळीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गोपाल ढोले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

