Mahabreaking

[breaking_news]

Dhamma Discourse :उगवा येथे भंते बी. संघपाल महाथेरो यांची धम्मदेशना; व्यसनमुक्तीचा दिला संदेश

Dhamma Discourse : येथील अशोक नगर परिसरात भदंत बी. संघपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेशना कार्यक्रम उत्साहात पार पडला. दि. २ जून रोजी रमाई उपासिका संघ व विश्वशांती तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Dhamma Discourse

तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहावे; भदंत बी. संघपाल महाथेरो यांचे आवाहन

शेषराव सिरसाट

 आगर : येथील अशोक नगर परिसरात भदंत बी. संघपाल महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेशना कार्यक्रम उत्साहात पार पडला. दि. २ जून रोजी रमाई उपासिका संघ व विश्वशांती तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेचे संस्कार प्रमुख डी. एस. ननिर, समता सैनिक दलाचे माणिकराव इंगळे, केंद्रीय शिक्षक सरोज डोंगरे तसेच तालुक्याचे माजी अध्यक्ष व बोधाचार्य शेषराव शिरसाट उपस्थित होते. धम्मदेशना देताना भदंत बी. संघपाल महाथेरो म्हणाले की, सध्याच्या काळात तरुण पिढी मोठ्या प्रमाणात विविध व्यसनांच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यासाठी केवळ तरुणच नव्हे तर पालकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. मुलांवर योग्य संस्कार करणे आणि त्यांना योग्य दिशा देणे ही पालकांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. समाजाने व्यसनमुक्तीच्या दिशेने एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरोज डोंगरे यांनी केले. तर डी. एस. ननिर यांनीही आपल्या मनोगतातून धम्म, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोंगरे टेलर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वशांती तरुण मंडळ व रमाई उपासिका संघाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने धम्म उपासक-उपासिका उपस्थित होते. अखेरीस त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top