Tractor Driver Killed : नांगरणीदरम्यान पंजी फसल्याने चालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आली. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. ही घटना टिटवण शिवारात गुरुवार, दि. २८ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जीवन मंगू राठोड (वय ४७, रा. तिवसा) असे मृतक चालकाचे नाव आहे.

ट्रॅक्टरची पंजी फसल्याने घडला अपघात ; कुटुंबावर मोठे संकट
बबन इंगळे
बार्शीटाकळी : नांगरणीदरम्यान पंजी फसल्याने चालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आली. यामध्ये चालकाचा मृत्यू झाला. ही घटना टिटवण शिवारात गुरुवार, दि. २८ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जीवन मंगू राठोड (वय ४७, रा. तिवसा) असे मृतक चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील खरीप हंगामातील पराटीच्या शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणीचे काम सुरू होते. यावेळी ट्रॅक्टरची पंजी मातीत अडकल्याने चालकाचा तोल गेला. तोल गेल्यानंतर जीवन राठोड हे ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण धुमाळ हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.
जीवन राठोड यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत मजुरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकल्याची भावना व्यक्त होत आहे.या दुर्दैवी घटनेमुळे टिटवण परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

