School Reconvenes :स्थानिक परशुराम नाईक विद्यालयातील इयत्ता दहावीमध्ये तब्बल २४ वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी जागवत एकत्र येत स्नेहसंमेलन साजरे केले. निमित्त होते विद्यालयाच्या २००२ बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्नेहसंमेलनाचे.

२४ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणींचा मेळावा; परशुराम नाईक विद्यालयात रंगले स्नेहसंमेलन
संजय तायडे
बोरगाव मंजू : स्थानिक परशुराम नाईक विद्यालयातील इयत्ता दहावीमध्ये तब्बल २४ वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेच्या आठवणी जागवत एकत्र येत स्नेहसंमेलन साजरे केले. निमित्त होते विद्यालयाच्या २००२ बॅचमधील माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या स्नेहसंमेलनाचे.
या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने तब्बल २४ वर्षांनंतर मित्र-मैत्रिणी पुन्हा बोरगाव मंजू येथे एकत्र आले. शिक्षणानंतर नोकरी, व्यवसाय व इतर कारणांमुळे विविध शहरांमध्ये व जिल्ह्यांत स्थायिक झालेल्या अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली. सध्या अनेकजण विविध क्षेत्रांत व महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.
या स्नेहसंमेलनात तत्कालीन शिक्षकांनी पुन्हा एकदा २४ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. त्यामुळे शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करत शालेय जीवनातील अनुभव कथन केले, तर काहींनी आपल्या यशस्वी जीवनप्रवासाविषयी माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान माजी शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. गुरुजन मनोज आगरकर, मोहन गुरुजी, वाहुरवाघ गुरुजी, पजई गुरुजी, राठोड गुरुजी आदी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
स्नेहसंमेलनाचे नियोजन स्वातीताई पांडव, हर्षाताई तायडे, पंकज शेंडे, सचिन नागरे, अमित वाडेवाले, कुलदीप दळवी, मंगेश जयस्वाल आणि आकाश गावंडे यांनी केले.
स्नेहसंमेलनातील प्रमुख आकर्षणे
जुन्या आठवणींना उजाळा : विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध ठिकाणांहून उपस्थित राहिले.
शिक्षकांचा पुन्हा वर्ग : २४ वर्षांपूर्वी शिकवणाऱ्या शिक्षकांनी पुन्हा एकदा वर्ग घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
मनोगत आणि सन्मान : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गमती-जमती सांगत जुने अनुभव शेअर केले, तर शिक्षकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

