Thief who robbed Ghatpuri temple :खामगाव शहरातील घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थानात चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ मे रोजी अटक केली. या चोरट्याकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तांत्रिक पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
गजानन तिडके
बुलढाणा : खामगाव शहरातील घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थानात चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ मे रोजी अटक केली. या चोरट्याकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड व अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदंबा देवी संस्थानात २४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९ वाजेपासून २५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिराच्या खिडकीचे गज तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर देवी व गणपतीच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने, अंदाजे ७३ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेण्यात आला होता.
या प्रकरणी अमोल काशीराम तेलगोटे (वय ३९, रा. रिधोरा, ता. जि. अकोला) यास तांत्रिक पुरावे व गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीकडून गुन्ह्यातील सुमारे २० ग्रॅम २० मिली वजनाची सोन्याची लगड, अंदाजे ३ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३३१(४) व ३०५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र अंभोरे, महिला मुख्य पोलीस शिपाई वनिता शिंगणे, पोलीस कर्मचारी अमोल शेजोळ, अजिस परसुवाले, मनोज खर्डे, शिवानंद हेलगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी कैलास ठोंबरे यांनी सहभाग घेतला.

