Mahabreaking

[breaking_news]

Chaos at Police Outpost :पोलीस चौकीत गोंधळ;  पोलिसालाच केली मारहाण,तिघांवर गुन्हा

Chaos at Police Outpost : आमचा रिपोर्ट आधी का घेत नाही, या कारणावरून तिघांनी पोलिसालाच मारहाण केल्याची घटना देऊळगाव मही येथील पोलीस चौकीत २४ मे रोजी रात्री घडली.   या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Chaos at Police Outpost

देऊळगाव मही येथील पोलीस चौकीतील घटना, रिपोर्ट न घेण्यावरून वाद

देऊळगाव राजा : आमचा रिपोर्ट आधी का घेत नाही, या कारणावरून तिघांनी पोलिसालाच मारहाण केल्याची घटना देऊळगाव मही येथील पोलीस चौकीत २४ मे रोजी रात्री घडली.   या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल पवन दादाराव दुनगहु (वय २७, बकल क्रमांक १०९१, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी रमेश मस्के, उमेश रमेश मस्के आणि सौरभ शिंगणे (सर्व रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, दि. २४ मे रोजी रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास देऊळगावमही पोलीस चौकी येथे संबंधित आरोपींनी “आमचा रिपोर्ट आधी का घेत नाही?” या कारणावरून वाद घालत पोलिसांकडे जाब विचारला. यावेळी फिर्यादी पोलीस कर्मचारी शासकीय कामात व्यस्त असताना आरोपींनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे.

वाद वाढल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व फिर्यादीला जखमी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४३/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) मधील विविध कलमांसह संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि लेखी तक्रारीच्या आधारे कारवाई करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top