Mahabreaking

[breaking_news]

Dispute escalates :‘५०० ऐवजी ३०० रुपयांचे पेट्रोल का?’ वाद विकोपाला; डोक्यात वीट मारल्याचा आरोप

Dispute escalates : तालुक्यातील देऊळगावमही येथे मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकण्याच्या पैशावरून झालेला किरकोळ वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याचा आरोप करत एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dispute escalates

 देऊळगाव मही येथील घटना; युवकाविरुध्द गुन्हा दाखल

  देऊळगाव राजा : तालुक्यातील देऊळगावमही येथे मोटारसायकलमध्ये पेट्रोल टाकण्याच्या पैशावरून झालेला किरकोळ वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एका व्यक्तीच्या डोक्यात वीट मारून जखमी केल्याचा आरोप करत एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनायक रघुनाथ शहाने (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश बनसोडे (रा. देऊळगावमही) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, दि. २४ मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास मोटारसायकलमध्ये ५०० रुपयांऐवजी ३०० रुपयांचे पेट्रोल टाकल्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घातला. वादादरम्यान शिवीगाळ करण्यात आली. त्यास विरोध केल्यानंतर आरोपीने फिर्यादीस धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप आहे.

त्यानंतर आरोपीने जवळच पडलेली वीट उचलून फिर्यादीच्या डोक्याच्या मागील भागावर मारल्याने ते जखमी झाले व त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४२/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top