Mahabreaking

[breaking_news]

Administration on alert :पेट्रोल-डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेगाव तालुक्यात प्रशासन सतर्क

Administration on alert :जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर 23 मे रोजी शेगाव शहर व तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांची प्रशासनाकडून संयुक्त पाहणी करण्यात आली. इंधनाचा सुरळीत पुरवठा कायम राहावा, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच साठेबाजीला आळा बसावा या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

Administration on alert

कृत्रिम टंचाई,साठेबाजी रोखण्यासाठी संयुक्त पाहणी

शेगाव  : जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पेट्रोल व डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर 23 मे रोजी शेगाव शहर व तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपांची प्रशासनाकडून संयुक्त पाहणी करण्यात आली. इंधनाचा सुरळीत पुरवठा कायम राहावा, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये तसेच साठेबाजीला आळा बसावा या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली.

या संयुक्त पाहणी पथकात तहसीलदार प्रज्ञा काकडे, पोलीस निरीक्षक निमिष कुमार मेहेत्रे, पीएसआय गावंडे, निरीक्षण अधिकारी संतोष बावणे तसेच पुरवठा निरीक्षक किशन केणे सहभागी झाले होते.

पथकाने शेगाव शहरासह तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांना भेट देऊन तेथील पेट्रोल व डिझेल साठ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित पेट्रोल पंप चालक व मालकांशी चर्चा करून इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले. यावेळी शेती हंगामाचा विचार करून शेतकरी वर्गाला प्राधान्याने पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्याबाबतही संबंधित पेट्रोल पंप चालकांना सूचित करण्यात आले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तसेच इंधनाची साठेबाजी होऊ नये या दृष्टिकोनातून संबंधित गावांतील पोलीस पाटील, सरपंच व ग्रामस्तरीय यंत्रणांनी प्रशासनास वेळोवेळी माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. कुठेही अवैधरित्या इंधन साठवणूक, कृत्रिम टंचाई किंवा नागरिकांची दिशाभूल होत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ प्रशासनाशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले.

पेट्रोल पंपांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच इंधनाचे सुरळीत वितरण होण्यासाठी प्रशासन व पोलीस विभागामार्फत कायमस्वरूपी बंदोबस्ताची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच वितरण प्रक्रियेत शिस्त राखली जावी यासाठी संबंधित यंत्रणा सतत दक्ष राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

तहसीलदार प्रज्ञा काकडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, पेट्रोल व डिझेल संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. इंधनाचा पुरवठा सुरळीत सुरू असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. भीतीपोटी नागरिकांनी पेट्रोल-डिझेलची अनावश्यक खरेदी किंवा साठेबाजी करू नये. नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top