Mahabreaking

[breaking_news]

Varodi Gram Panchayat :मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वरोडी ग्रामपंचायत तालुक्यात द्वितीय

Varodi Gram Panchayat : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा पंचायतराज समितीकडून घेण्यात आला. या अभियानात वरोडी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

Varodi Gram Panchayat

पंचायतराज समितीकडून विकासकामांचा आढावा; ग्रामविकासाच्या उपक्रमांना ८४ टक्के गुण

साखरखेर्डा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा पंचायतराज समितीकडून घेण्यात आला. या अभियानात वरोडी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

वरोडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. अन्नपूर्णा गारोळे यांनी मागील तीन वर्षांत शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्या प्रभावीपणे राबविल्यामुळे गावाच्या विकासाला गती मिळाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीमार्फत रस्ते विकास, सांडपाणी व्यवस्थापन, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुविधा, वृक्षारोपण, स्मशानभूमीची स्वच्छता व दुरुस्ती, मंदिरांचे सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच शुद्ध पाणीपुरवठा यांसारख्या विविध कामांद्वारे गावाचा कायापालट करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मागील महिन्यात पंचायतराज समितीने वरोडी गावाला भेट देऊन विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली होती. यावेळी ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील एकूण १० ग्रामपंचायतींची या अभियानासाठी निवड करण्यात आली होती.

सरपंच सौ. अन्नपूर्णा गारोळे आणि ग्रामसचिव सरला गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कामांना समितीकडून ८४ टक्के गुण देण्यात आले. या गुणवत्तापूर्ण कामगिरीमुळे वरोडी ग्रामपंचायतीने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला असून गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top