Mahabreaking

[breaking_news]

  Unidentified Youth Murdered :यावलखेड परिसरात अनोळखी युवकाची दगडाने ठेचून हत्या

Unidentified Youth Murdered : अनोळखी युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना  यावलखेड लोहमार्ग परिसरात 22 मे रोजी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावर भेट देवून पाहणी केली.

Unidentified Youth Murdered

 लोहमार्ग परिसरात युवकाचा मृतदेह आढळला; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची घटनास्थळाला भेट

 बोरगाव मंजू : अनोळखी युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना  यावलखेड लोहमार्ग परिसरात 22 मे रोजी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावर भेट देवून पाहणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी सकाळच्या सुमारास यावलखेड नजीकच्या लोहमार्ग परिसरात एका युवकाचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर सील करून पंचनामा व प्राथमिक तपास सुरू केला.

या घटनेची गंभीर दखल घेत एलसीबीचे ठाणेदर शंकरराव शेळके यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. ठसेतज्ज्ञ आणि पोलीस पथकाच्या मदतीने घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात येत आहेत.

मृत युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून, तो नेमका कोण आणि कुठल्या भागातील आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. युवकाच्या मृत्यूमागे नेमके कारण काय, तसेच हा प्रकार वैयक्तिक वाद, पूर्ववैमनस्य की अन्य कोणत्या कारणातून घडला, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळी ठाणेदार अनिल गोपाळ, उपनिरीक्षक रविंद्र धुळे, हेडकॉन्स्टेबल प्रमोद गोपनारायण, सचिन सोनटक्के, शेखर कोद्रे, अनिल अंबिलकर, अक्षय देशमुख यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश असून पोलिसांकडून परिसरातील माहिती संकलन, तांत्रिक तपास आणि ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top