Mahabreaking

[breaking_news]

Ample Stock of Petrol and Diesel :जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; अफवांवर विश्वास ठेवू नका – पालकमंत्री  

Ample Stock of Petrol and Diesel :जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी संयम राखत आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Ample Stock of Petrol and Diesel

 इंधन टंचाईची भीती निराधार; आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करण्याचे आवाहन

 बुलढाणा : जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी संयम राखत आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या चर्चांमुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अफवांच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांकडून अतिरिक्त इंधन साठवण्याचाही प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र जिल्ह्यात इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी विविध तेल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर इंधनाचा पुरवठा जिल्ह्यात करण्यात आला. यामध्ये Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) कडून १ लाख २ हजार ५०० लिटर पेट्रोल आणि ३ लाख ५ हजार ५०० लिटर डिझेल, Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) कडून १ लाख ५ हजार लिटर पेट्रोल व ३ लाख ७४ हजार लिटर डिझेल, तर Indian Oil Corporation Limited (IOCL) कडून ६ लाख ८० हजार लिटर पेट्रोल आणि ७ लाख २५ हजार लिटर डिझेलचा पुरवठा झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ८ लाख ८७ हजार ५०० लिटर पेट्रोल आणि १४ लाख ४ हजार ५०० लिटर डिझेल उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

गॅस सिलेंडर पुरवठ्याबाबतही जिल्ह्यात कोणतीही कमतरता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या नियमित ४ लाख ६३ हजार ४९४ ग्राहकांबरोबरच उज्ज्वला योजनेतील २ लाख ५ हजार ७१५ लाभार्थ्यांना सेवा दिली जात आहे. दररोज सुमारे ७ हजार ९५० गॅस सिलेंडरचे वितरण होत असून १६ हजार ४४८ सिलेंडरचा राखीव साठा उपलब्ध आहे.

पालकमंत्री मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांना शेतीकामांसाठी आवश्यक तेवढे इंधन उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे नमूद केले. नागरिकांनी घाबरून इंधनाची साठेबाजी न करता केवळ आवश्यकतेनुसार खरेदी करावी आणि पेट्रोल पंपांवरील अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top