Mahabreaking

[breaking_news]

Fervor of Devotion :जगदंबा माता उत्सवात भक्तीचा जल्लोष; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

Fervor of Devotion : साखरखेर्डा येथील माळावरील जगदंबा माता उत्सव यंदाही मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसर भक्तिमय झाला होता.

Fervor of Devotion

महालक्ष्मी आरती, महापूजा अन् महाप्रसाद; जगदंबा माता उत्सवात भाविकांची मोठी गर्दी

साखरखेर्डा  : साखरखेर्डा येथील माळावरील जगदंबा माता उत्सव यंदाही मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसर भक्तिमय झाला होता.

दरवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यात साजरा होणारा जगदंबा माता महोत्सव यावर्षी 19 मे रोजी उत्साहात पार पडला. सकाळी काकडा आरतीने उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर माजी सरपंच सौ. सुमनताई जगताप आणि माजी उपसभापती सुनील जगताप यांच्या हस्ते देवीची महापूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

दुपारच्या सत्रात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावासह परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण नियोजन करण्यात आले होते.

यावेळी गावापासून मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करण्यात यावा, अशी मागणी उत्सव समितीने आमदार Manoj Kayande यांच्याकडे केली. आमदारांचे बंधू सतीश कायंदे यांनी मंदिरात भेट देत देवीचे दर्शन घेतले तसेच रस्ता कामासाठी सकारात्मक भूमिका घेऊन “या कामाची जबाबदारी आमची राहील,” असे आश्वासन दिले.

उत्सवप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, माजी सरपंच कमलाकर गवई, भाजपा प्रदेश सदस्य रावसाहेब देशपांडे, गणेशसिंग राजपूत, भगवानसिंग राजपूत, दिलीप खंडारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उत्सव समितीच्या वतीने महाप्रसाद व संपूर्ण धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top