Mahabreaking

[breaking_news]

Farmer Attacked :धुऱ्याच्या मातीच्या वादातून शेतकऱ्यावर हल्ला; दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Farmer Attacked : शेतातील धुऱ्याच्या मातीच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याला काठीने मारहाण केल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Farmer Attacked

देऊळगाव राजा : शेतातील धुऱ्याच्या मातीच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याला काठीने मारहाण केल्याची घटना देऊळगाव राजा तालुक्यातील खल्याळ गव्हाण येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विष्णु नंदाजी डोईफोडे (वय ६५, रा. खल्याळ गव्हाण, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात गणेश नामदेव दंदाले आणि अमोल दंदाले (दोन्ही रा. खल्याळ गव्हाण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १८ मे रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. फिर्यादी विष्णु डोईफोडे हे त्यांच्या शेतामध्ये ट्रॅक्टरने धुऱ्यावर वळण टाकत असताना आरोपी गणेश दंदाले तेथे आला. धुऱ्याची माती आपल्या शेतात पडत असल्याचे सांगत त्याने आक्षेप घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला.

तक्रारीनुसार, त्यानंतर गणेश दंदाले यांनी घराजवळ असल्याने त्यांचा मुलगा अमोल दंदाले याला बोलावून घेतले. अमोल हा हातात काठी घेऊन घटनास्थळी आला व शिवीगाळ करत फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. काठीने बरगडी, छाती व डोक्यावर मारहाण करण्यात आल्याने विष्णु डोईफोडे जखमी झाले. तसेच खाली पाडून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. फिर्यादीच्या आरोपानुसार, गणेश दंदाले यांनीही मारहाणीत सहभाग घेत शिवीगाळ केली व दोघांनी मिळून जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर जखमी शेतकऱ्याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top