Mahabreaking

[breaking_news]

Theft of Prawns :धरणात विषारी औषध टाकून झिंग्यांची चोरी? देऊळगाव राजात दोघांविरुद्ध गुन्हा

Theft of Prawns : खडकपूर्णा धरण परिसरातील जलाशयात विषारी औषधांचा वापर करून झिंगा (श्रिंप) चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या अंदाजे ४० किलो झिंगा मालाची किंमत सुमारे ३२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Theft of Prawns

देऊळगाव राजा : खडकपूर्णा धरण परिसरातील जलाशयात विषारी औषधांचा वापर करून झिंगा (श्रिंप) चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या अंदाजे ४० किलो झिंगा मालाची किंमत सुमारे ३२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू हरीराम मौर्या (वय ३३), मूळ रा. सहागंज, जौनपूर (उत्तर प्रदेश), हे खडकपूर्णा लोटस सी फूड प्रकल्पाचे व्यवस्थापक असून, सध्या खल्याळ गव्हाण, ता. देऊळगाव राजा येथे वास्तव्यास आहेत. संबंधित कंपनीने वाशीम जिल्ह्यातील पुसद येथील लोटस सी फूड कंपनीमार्फत भागीदारी तत्त्वावर धरण क्षेत्रात झिंगा बिजोत्पादन प्रकल्प सुरू केला आहे.

धरण क्षेत्रातील जलाशयात झिंगा बिज सोडण्यात आले असून, त्याच्या सुरक्षेसाठी कंपनीकडून रखवालदारांकडून दिवस-रात्र स्पीडबोटीच्या साहाय्याने गस्त घालण्यात येत होती. मात्र, मागील महिनाभरापासून जलाशयाच्या काठावर काही व्यक्ती विषारी औषधांचा वापर करून झिंगा चोरी करत असल्याचे निदर्शनास येत होते. यामुळे कंपनी प्रशासनाने संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, ७ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास टाकरखेड भागीले शिवारातील धरण कमान परिसरात गारगुंडी भागाजवळ संशयास्पद हालचाल दिसून आली. यावेळी आरोपी समीर पठाण (रा. मंडपगाव, ता. देऊळगाव राजा) हा मोटारसायकलवरून थैलीत अंदाजे ४० किलो झिंगा घेऊन जाताना आढळल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या झिंग्यांची किंमत सुमारे ३२ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात विकास काकड (रा. गारगुंडी) याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात कायम अपराध क्रमांक २२१/२०२६ अंतर्गत कलम ३०३(२), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शरद साळवे करीत असून, झिंगा चोरीमागील नेमके रॅकेट, विषारी औषधांचा वापर आणि इतर संबंधितांचा सहभाग याबाबत चौकशी सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top