Tejrao Deshmukh : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी शहरांचा मार्ग धरावा लागतो. पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत आणि चिकाटी आवश्यक असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत शंकर दुबे यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून सवडद गावाचे नाव उज्ज्वल केले आहे, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी केले.

पीएसआय शंकर दुबे यांचा सत्कार
साखरखेर्डा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी शहरांचा मार्ग धरावा लागतो. पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत आणि चिकाटी आवश्यक असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत शंकर दुबे यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून सवडद गावाचे नाव उज्ज्वल केले आहे, असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी केले.
सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद हे गाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असून गावात केवळ सातवीपर्यंत शाळेची सुविधा आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षणासाठी साखरखेर्डा येथे जावे लागते. उच्च शिक्षणासाठी साखरखेर्डा, खामगाव, बुलढाणा किंवा छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन शिक्षण घ्यावे लागते. बाहेरगावी राहून शिक्षण घेताना ग्रामीण विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
शंकर दत्तात्रय दुबे हे प्रथम छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस दलात भरती झाले. मात्र जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.
दि. १० मे रोजी सवडद गावात त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त स्वागत केले. तेजराव देशमुख तसेच माजी सरपंच रुख्मिणा देशमुख यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला दत्तात्रय दुबे, शहाजी देशमुख, गणेश देशमुख, राजू देशमुख, गजानन देशमुख, सतीश देशमुख, बबन मोरे, लक्ष्मण देशमुख, कैलास दुबे, संतोष देशमुख, विजय देशमुख आणि प्रगती देशमुख आदी उपस्थित होते.

