Mahabreaking

[breaking_news]

Surveyor Caught Red-Handed and Jailed :प्लॉट मोजणीसाठी मागितली १० हजारांची लाच; भूमापक रंगेहाथ गजाआड

Surveyor Caught Red-Handed and Jailed :प्लॉट मोजणीचे काम लवकर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. १२) जळगाव जामोद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली.

Surveyor Caught Red-Handed and Jailed

जळगाव जामोदमध्ये भूमी अभिलेख कार्यालयात बुलढाणा एसीबीची धडक कारवाई

जळगाव जामोद : प्लॉट मोजणीचे काम लवकर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागून स्वीकारणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत एका कर्मचाऱ्याला रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. १२) जळगाव जामोद येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात करण्यात आली.या प्रकरणातील आरोपींमध्ये विश्वजीत विनायक सोनोने (वय ५३), पद – परिरक्षण भूमापक, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव जामोद तसेच सचिन सदाशिव वाजपे (वय ४८), पद – मुख्यालय सहाय्यक, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, जळगाव जामोद यांचा समावेश आहे.

तक्रारदार यांनी १९ जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या वडिलांच्या नावावरील प्लॉटच्या मोजणीसाठी शासकीय शुल्क भरून ऑनलाईन अर्ज केला होता. त्यानंतर १६ मार्च रोजी भूमापक विश्वजीत सोनोने यांनी तक्रारदारांना कार्यालयात बोलावून अर्जात मोबाईल क्रमांक व प्लॉटच्या दिशांबाबत त्रुटी असल्याचे सांगितले. अर्ज रद्द न करता त्रुटींची पूर्तता करून मोजणी लवकर करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदारांनी १७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. पडताळणीदरम्यान सोनोने यांनी तक्रारदारांना मुख्यालय सहाय्यक सचिन वाजपे यांना भेटण्यास सांगितले. त्यावेळी वाजपे यांनीही काम करून देण्यासाठी सोनोने यांना १० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगत लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर एसीबीने सापळा रचला. मंगळवारी करण्यात आलेल्या कारवाईत विश्वजीत सोनोने यांनी तक्रारदारांकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिल्यानंतर त्यांना भूमी अभिलेख कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुसिंगे, पोलीस निरीक्षक आणि सापळा पथक पोहेकों दिपक जाधव, अमोल झिने, पोकॉ. शैलेश सोनवणे, रंजीत व्यवहारे, पंढरी शेळके, चापोकों अर्शद शेख, नापोकों नितीन शेटे सर्व अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी पार पाडली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो बुलढाणा येथे दुरध्वनी क्रमांक ०७२६२-२४२५४८ व व्हॉटस अॅप क्रमांक ९४०५०९१०६४ तसेच टोल फ्री क्रमांक १०६४ सावर संपर्क साधून तक्रार करावी.

भागोजी चोरमले, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top