Smt. Dhanabai School : येथील श्रीमती धनाबाई स्कूलने सन २०२५-२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेसह संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. परीक्षा निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

दहावी परीक्षेत विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी; परिसरात आनंदाचे वातावरण
ज़ाकिर अहमद
बाळापूर : येथील श्रीमती धनाबाई स्कूलने सन २०२५-२६ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेसह संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. परीक्षा निकाल जाहीर होताच विद्यालय परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
विद्यालयातील अश्विनी रमेश इंगळे हिने ९१.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर हरीश दयाराम लासुरे याने ८९ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच अनुष्का संतोष टेमघरे हिने ८७.४० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या यशाचे श्रेय त्यांच्या अथक परिश्रमांना, शिक्षकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाला तसेच पालकांच्या सातत्यपूर्ण सहकार्याला दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी उदाहरण निर्माण झाले आहे. यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार केला. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यालयाच्या या घवघवीत यशाची संपूर्ण बाळापूर परिसरात चर्चा सुरू असून नागरिकांकडून विद्यालय प्रशासन व विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

