Unidentified Scorpio Collides : भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने पिता पुत्र जखमी झाल्याची घटना 9 मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Unidentified Scorpio Collides with Two-Wheeler in Dongav; Father and Son Injured
डोणगाव : भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला धडक दिल्याने पिता पुत्र जखमी झाल्याची घटना 9 मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध डोणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरेगाव ता. मेहकर येथील रहिवासी सुधीर बबनराव टाले आणि त्यांचा मुलगा विवेक सुधीर टाले हे ९ मे रोजी रात्री सुमारे ८.५७ वाजता एमएच २८ बीवाय ३३३३ क्रमांकाच्या मोटारसायकलने डोणगावहून आरेगावकडे जात होते. ते आरेगाव रोडवरील सारडा किराणा दुकानासमोर पोहोचले असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात स्कॉर्पिओ चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सुधीर टाले व विवेक टाले हे दोघे जखमी झाले. याप्रकरणी पवन महादेवराव टाले, रा. आरेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डोणगाव पोलिसांनी अज्ञात स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (अ) व १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अमरनाथ नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण सानप करीत आहेत. दरम्यान, भरधाव वाहनांमुळे वाढत असलेल्या अपघातांबाबत परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपी चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

